Andheri By Poll Election 2022 – अनिल परबांनी केला मोठा आरोप; नोटांचा वापर करुन ‘नोटा’ला मतदान करण्यासाठी दबाव

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll 2022) उद्या दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केलेल्या आरोपांमुळे मात्र खळबळ माजली आहे.

Andheri By Poll Election 2022 – अनिल परबांनी केला मोठा आरोप; नोटांचा वापर करुन ‘नोटा’ला मतदान करण्यासाठी दबाव

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll 2022) उद्या दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केलेल्या आरोपांमुळे मात्र खळबळ माजली आहे. अंधेरीत (Andheri News) नोटांचा वापर करुन ‘नोटा’ला मतदान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे.

निवडणूक आयोगानं अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. ३ नोव्हेंबर म्हणजेच, उद्या मतदान होणार असून ६ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबरपासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदार संघ क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, शिवेसेनेतील दोन गट ठाकरे समर्थक असलेला शिवसेना : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे गट’ आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असलेला शिंदे गट हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शिवसेनेतील बंडाचा प्रभाव अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.

आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात गुरुवारी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज भाजपकडून मागे घेण्यात आला आहे. त्यामुळं ऋतुजा लटके यांचा सामना केवळ अपक्ष उमेदवारांशी आहे. पण तरीही अंधेरीच्या पोटनिवडणुकीत वादाचे पडघम वाजत आहेत. या पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नोटांचा वापर हा नोटा पर्यायावर मतदान करण्यासाठी होणार असल्याची माहिती आणि पुरावे आमच्याकडे आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. त्यासंदर्भात सोशल मीडियावरील विशेष करून आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व्हिडीओ क्लिप आपण निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे सादर केल्याची माहिती परब यांनी दिली आहे.

अनिल परब आणि ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी काल (मंगळवारी) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अनिल परब यांनी खळबळजनक आरोप केले. अनिल परब म्हणाले की, “पोटनिवडणुकीसाठी काही लोकांना नोटा देऊन, नोटा बटण दाबण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यासंदर्भात आम्ही पोलीसांना तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाला आम्ही क्लिप्स पाठवल्या आहेत. जे कोणी हे कृत्य करतंय त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आरपीएआयचे कार्यकर्ते असा उघड प्रकार करत आहेत. आरपीआय हा त्यांचा मित्र पक्ष आहे. नोटांचं बटण दाबून निषेध व्यक्त करा, असा प्रचारही त्यांच्याकडून केला जातोय.”

हे ही वाचा :

Happy birthday Shah Rukh Khan : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या वाढदिसानिमित्त खास फोटो

IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी चांगली बातमी, पावसाची शक्यता पूर्णपणे संपुष्टात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version