Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुरजी पटेलांची पहिली प्रतिक्रिया…

अखेर मुरजी पटेल (murji patel) यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी तशी घोषणा केली आहे. बावनकुळे यांच्या घोषणेनंतर मुरजी पटेल आता काय करणार असं सांगितलं जात होतं.

Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुरजी पटेलांची पहिली प्रतिक्रिया…

अखेर मुरजी पटेल (murji patel) यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी तशी घोषणा केली आहे. बावनकुळे यांच्या घोषणेनंतर मुरजी पटेल आता काय करणार असं सांगितलं जात होतं. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या प्रतिक्रियेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतानाच पटेल यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे. आमच्यासाठी पक्षादेश महत्त्वाचा असून मी नाराज नाही, अशी प्रतिक्रिया मुरजी पटेल यांनी व्यक्त केली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजप-शिंदे गट युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी प्रतिक्रिया दिले आहे. आपण पक्षाच्या आदेशाचं पालन करु असं स्पष्ट सांगितलं. तसेच, मी एकदम खूश आहे आणि पक्षाचा आदेश मानणार आहे. त्यावर तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार का? असं विचारल्यावर मुरजी पटेल यांनी अजिबात नाही… अजिबात नाही… असं म्हणत आपण पक्षाच्याच आदेशाचं पालन करणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. भाजप माझी आई आहे. भाजपसाठी मरेपर्यंत काम करत राहू. पक्षाचा आदेश आमच्यासाठी शिरसांवद्य आहे. पदावर असो, नसो आम्ही अंधेरीची सेवा करू. अंधेरीच्या लोकांनी साथ दिली. त्यांच्यासोबत काम करत राहीन. मी आधीही काम करत होतो. नंतरही काम करेल. आधीपेक्षा मी अधिक ताकदीने काम करेल, असं मुरजी पटेल म्हणाले. मी अपक्ष लढणार नाही. पक्षाचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. ऋतुजा ताईला मी शुभेच्छा देतो. केंद्र आणि राज्यातील नेत्याने माघार घ्यायचं ठरवलं. मी तात्काळ आदेश मानला. पार्टीचा आदेश येतो. तो पाळायचं काम आमचं असतं.

एकीकडे मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली. तसेच, त्यांनी बोलताना पक्षाचा आदेश मानणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण दुसरीकडे मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र अंधेरीत राडा घातला. कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातच घोषणाबाजी केली. तसेच, यावेळी काही अपशब्दांचाही वापर कार्यकर्त्यांनी केला.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचा निर्णय झाल्यावर. कुणीही पक्षाच्या विरोधात जात नाही. मुरजी पटेल युतीचे उमेदवार होते. त्यांच्यावर शंका घेण्याचं कारणच नाही. ते पक्षाचा आदेश पाळतील, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. भाजपने अनेकदा असे निर्णय घेतले आहेत. आमदाराचं निधन होतं. तेव्हा माघार घेतो. आमची संस्कृती आहे. ही संस्कृती आजची नाही. अटलजींच्या काळापासूनची आहे, असंही बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा:

Andheri By-Election 2022 : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध, भाजपने घेतली माघार

Gram Panchayat Election Results 2022 : ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल, सर्व अपडेट्स…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version