Andheri By Poll Election 2022 : प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्विट; म्हणाले…

Andheri By Poll Election 2022 : प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्विट; म्हणाले…

मागील काही दिवसांपासून अंधेरी पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं होतं. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र शिंदे गट-भाजपचे उमेदवाराने माघार घेतली आहे. ही निवडणूक बिनविरोध करा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केले होतं. यादरम्या नकाल रात्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करा अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपने निवडणुकीतून माघार घेतली, त्यानंतर सरनाईकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतल्याची घोषणा दुपारी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठकारे यांनी आभार मानणारे पत्र लिहित आभार मानले होते, पत्रामध्ये राज ठाकरे यांनी लिहले आहे की, काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार.

पुढे त्यांनी म्हटले की, चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार अशा शब्दात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा :

Raj Thackeray: भाजपच्या मतपरिवर्तनानंतर राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार

Andheri By-election 2022 : निवडणूक बिनविरोध लढवण्याच्या निर्णयावर प्रभाव कोणाचा? ठाकरे की पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version