Andheri By Poll Election 2022 : राज ठाकरेंनी आणखी एक पत्र लिहावं, सुषमा अंधारेंनी सांगितलं मजकूर !

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून (Andheri By Poll Election) भाजपने (BJP) माघार घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Andheri By Poll Election 2022 : राज ठाकरेंनी आणखी एक पत्र लिहावं, सुषमा अंधारेंनी सांगितलं मजकूर !

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून (Andheri By Poll Election) भाजपने (BJP) माघार घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीतून माघार घेणं हीच रमेश लटके यांना श्रद्धांजली ठरेल, असं पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलं, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडूनही अशीच भावना व्यक्त करण्यात आली.

अखेर भाजपने माघार घेतली आहे आणि या सर्व प्रकरणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Shiv Sena leader Sushma Andhare) यांनी भाजपने माघार घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा संवेदनशील राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पत्र म्हणजे भाजपची स्क्रीप्ट आहे. ‘राज ठाकरेंच्या पत्राचा परिणाम खरंच भाजपवर होत असेल किंवा भाजप त्यांचं ऐकत असेल, तर राज ठाकरेंनी आणखी एक पत्र लिहावं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वारंवार महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असे राज्यपाल तथाकथित महाशक्तीने परत बोलावले पाहिजेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी पत्र लिहा,’ असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चा भाग; संजय राऊत

हा निर्णय घेतल्याबद्दल भाजपाचे आभार – नरेश म्हस्के

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version