spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ANDHERI BY POLL ELECTION 2022 :- ऋतुजा लटके यांना नोटाची टक्कर

३ नोव्हेंबरला अंधेरीमध्ये पोटनिवडणूक झाल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरवात झाली. त्यानंतर ऋतुजा लटके यांनी नोटाच मोठं आव्हान समोर होतं. राज्यात काही दिवसांपासून राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ५८८७५ इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत.तर नोटाला ११५६९ इतकी मत मिळाली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही निवडणूक अटीतटीची ठरली आहे. अवघ्या राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना ९० ते ९५ टक्के मतं मिळतील, असा अंदाजही व्यक्त केला होता.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या (Andheri Bypoll vote counting) पोटनिवडणुकीची मतमोजणी पारपडली. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या अपेक्षेप्रमाणे आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ पर्यायाला (NOTA) मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असल्याचे दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Uddhav Thackeray)मतदानापूर्वी नोटाला मतदान करण्याचे आव्हान विरोधकांकडून केले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. अंधेरी पूर्वचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे ठाकरे गटाकडून या निवडणुकीसाठी जोर लावण्यात आला होता. तर, दुसरीकडे भाजपने या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अचानकपणे त्यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पटेल समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातही घोषणाबाजी केली होती.

नोटांचा वापर करुन ‘नोटा’ला मतदान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला होता. यासंदर्भातील माहिती आणि पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला होता. सोशल मीडियावरील विशेष करून आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व्हिडीओ क्लिप आपण निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे सादर केल्याची माहिती परब यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

हे ही वाचा :

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार

‘महाराष्ट्रतील सरकार हे शेतकरी विरोधी आहे’; नाना पाटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss