spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Andheri By Poll Election 2022 : दोन्ही पक्षच्या उमेदवांचे अर्ज दाखल, आमचाच विजय पक्का दोन्हीकडून आत्मविश्वास

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांची लढत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याशी होणार आहे. ही पोटनिवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याने या निवडणुकीकडे केवळ राज्याचच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपची आणि शिंदे गटाचीही प्रतिष्ठापणाला लागणार आहे. मात्र, मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार हे येत्या ६ नोव्हेंबर रोजीच्या निकालात दिसून येणार आहे.

हेही वाचा : 

Andheri By Poll Election 2022 : “…पक्षाचं नाव बदलून ‘रडकी सेना’ असं ठेवावं” आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. ऋतुजा लटके यांनी मनपा कार्यालयात जाऊन राजीनाम्याचं पत्र घेतले. आणि नुकतेच त्यांनी उमेदवार अर्ज देखील भरला आहे. लटके त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आदित्य ठाकरे, अनिल परब, प्रियांका चतुर्वेदीसह अनेक नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे, शक्ति प्रदर्शन झाल्यानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुरजी पटेल यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, भाजप नेते आशिष शेलार सहभागी झाले होते. अंधेरीत अटीतटीचा सामना रंगणार असल्याचं दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पक्षचिन्ह मिळूनही उमेदवार उभा केलेला नाही. या ठिकाणी भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनाम स्वीकारण्यास नकार दिल्याने काही काळ त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मात्र, उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला फटकारल्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. आता आज (१४ ऑक्टोबर) अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही उमेदवार उमेदवारी अखेर अर्ज दाखल केलं आहेत.

Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आम्ही जिंकूच – चंद्रशेखर बावनकुळे

नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ‘जास्त म्याव म्याव केलं, तर ते बंद करण्याची सर्व औषधं माझ्याकडे आहेत’ असा इशारा त्यांनी दिला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांना जिवंतपणी त्रास दिल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

अनिल परब यांनी आत्मविश्वास व्यक्त केला

अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके निवडून येतील. आम्ही बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. मात्र, निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत आणि मोठ्या मताधिक्याने जिंकू, असा विश्वास माजी मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.

Andheri By Poll Election 2022 : माणुसकी विरुद्ध खोके सरकार – आदित्य ठाकरे

Latest Posts

Don't Miss