Andheri Bypoll Result : गुलाल कोणाचा? अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल (Andheri Bypoll Result 2022) आज दि. ६ नोव्हेंबर जाहीर होणार आहे. ऋतुजा लटके (rutuja latke) विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

Andheri Bypoll Result : गुलाल कोणाचा? अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल (Andheri Bypoll Result 2022) आज दि. ६ नोव्हेंबर जाहीर होणार आहे. ऋतुजा लटके (rutuja latke) विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ३ नोव्हेंबरला मतदान पार पडलं होतं. याची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा विजय जवळपास निश्चित मनाला जात आहे. कारण त्यांच्या विरोधात कोणत्याही मुख्य पक्षांनी आपला उमेदवार निवडणुकीत उतरवला नाही. शिवसेनेतील फुटीनंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलं आहे. या पोटनिवडणुकीसाठी तीन नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले होते. सर्व मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली होती. या निवडणुकीसाठी ८१ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांनं माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचं पारडं जड मानलं जातं आहे. एकूण २५६ मतदान केंद्रांवर, ८१ हजार मतदारांनी हक्क बजावला.

पोटनिवडणुकीसाठी हे ७ उमेदवार रिंगणात

१. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
३. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. नीना खेडेकर (अपक्ष)
५. फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. राजेश त्रिपाठी (अपक्ष)

दरम्यान, अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत बरेच ट्विस्ट आले. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई महापालिकेत कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला, पण त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. अखेर हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेला ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. पण अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तशी विनंती केली. त्यानंतर भाजपने आपला उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं. त्यामुळे आता लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालसह ६ राज्यांमधील विधानसभेच्या ७ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांसाठीची मतमोजणी देखील आजच होणार आहे.

हे ही वाचा :

निलेश राणे यांना मोठा दिलासा; जिल्हा न्यायालयाच्या बाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली

आज साऊथचे चित्रपट काम करत आहेत पण आम्ही… : रकुल प्रीत

चंद्रशेखर बावनकुळेंना त्यांच्या पक्षाततरी कोण विचारते का? ; नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version