Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Andheri East By poll 2022 : ऋतुजा लटकेंना दिलासा; कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने बीएमसीला दिले आहेत. ऋतुजा लटके आणि मुंबई महापालिका अशा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टानं दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आपला निकाल दिला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने बीएमसीला दिले आहेत. ऋतुजा लटके आणि मुंबई महापालिका अशा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टानं दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आपला निकाल दिला. हायकोर्टानं थेट मुंबई महापालिकेला आदेश दिला की, उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या. या परिस्थितीत आम्हाला हस्तेक्षेप करावा लागत आहे, अशी टिप्पणीही यावेळी हाकोर्टानं निर्णय देताना केली. हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर अनिल परब यांनी शुक्रवारी ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगितलं.

रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांचा उद्या (शुक्रवार) सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा मंजूर केला जाईल. उद्या मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्त्यांसह आम्ही ऋतुजा रमेश लटके यांचा उमेदवारी अर्ज भरू, अशी पहिली प्रतिक्रिया अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांना दिली . तसेच अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन पहिल्यादिवसांपासूनच केलं आहे. महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारची संस्कृती आहे. पण सध्याचं राजकारण चांगलं चाललेलं नाही. म्हणून आतापर्यंत एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला अन् तिकडे जर पोटनिवडणूक झाली आणि तिथे जर घरचे कुणी उभं असेल तर आजपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यांनी मोठं मन दाखवावं अन् ही निवडणूक बिनविरोध करावी. ही निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्रात अजूनही संस्कृती आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला दिसेल, असे अनिल परब म्हणाले.

हे ही वाचा : मोठी बातमी Andheri bypoll Election ! ऋतुजा लटकेंचा उमेदवारीचा मार्ग मोकळा

रमेश लटके यांच्या दुर्देवी निधनानंतर शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली होती. पंरतु अतिशय साधं हे प्रकरण होतं. पण ऋतुजा रमेश लटके यांनी निवडणूक लढवू नये, यासाठी शेवटच्या मिनिटांपर्यंत प्रयत्न केले गेले. सगळ्या बाबी क्लिअर होत्या. कायद्यात असणाऱ्या तरतुदी होत्या. त्यांना ज्या तरतुदी लागू होतात. एक महिन्याची नोटीस अथवा एक महिन्याचा पगार.. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी नाही. त्याचप्रकारे कोणताही रक्कम त्यांना देय लागत नाही. इतक्या सरळ तरतुदी असनातादेखील आम्हाला हायकोर्टात जावं लागलं, ही दुर्देवी बाब आहे. एखादी विधवा महिला निवडणूका उतरते, तेव्हा तिच्याबाबत सहानभुतीचं धोरण असायला हवं. परंतु ज्या पद्धतीनं अशा पद्धतीची अडकाठी केली. आज दुपारपर्यंत महानगरपालिकेच्या वकिलांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराची केस असल्याचं सांगितलं. अन् ती १२ तारखेला (बुधवार) आली आहे. तीन तारखेला त्यांनी राजीनामा दिलाय, त्या ऑफिसला जात नाहीत आणि १२ तारखेला त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. म्हणजे किती खालच्या पातळीला जाऊन राजकारण चाललेय, हे आज महाराष्ट्राच्य जनतेनं पाहिलेय. परंतु न्यायदेवतेचे आभार मानतो. आम्हाला न्याय मिळेल, आमचा विश्वास होता. आज न्यायदेवतेनं न्याय दिला आहे, असे अनिल परब यांनी सांगितलं.

हे ही वाचा :

Rutuja Latke : मनपाचा ऋतुजा लटकेंना झटका, भ्रष्टाचाराचे आरोप करत हायकोर्टात युक्तिवाद सुरूच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss