Andheri East By Poll Election : ऋतुजा लटकेंच्या मुलाची मोजक्या शब्दात नेमकी प्रतिक्रिया

Andheri East By Poll Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयांकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Andheri East By Poll Election : ऋतुजा लटकेंच्या मुलाची मोजक्या शब्दात नेमकी प्रतिक्रिया

Andheri East By Poll Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ऋतुजा रमेश लटके यांचं पुत्र अमेय लटके यांनी मातोश्रींच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा असे म्हणत मोजक्या शब्दात नेमकी प्रतिक्रिया दिली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आहे. उद्धव साहेब, परब साहेब किंवा शिवसेनेकडून जो पाठिंबा मिळत आलाय, तो निवडणूक संपेपर्यंत असाच राहू दे, तुमचे आशीर्वाद राहूदेत, न्यायाची जी लढाई आम्ही लढतोय, त्यात यश मिळू दे, अशी आशा ऋतुजा रमेश लटके यांचे सुपुत्र अमेय लटके यांनी व्यक्त केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेने तातडीने राजीनामा स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ऋतुजा लटके यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. लटके यांच्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने मुंबई महापालिकेच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढत उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र लटके यांना देण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत.

पालिकेतर्फे युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्वीकारण्यामागील कारणं सांगितली होती. ‘माझा राजीनामा विशिष्ट तारखेला किंवा विशिष्ट दिवसांत स्वीकारावा, असं म्हणण्याचा कर्मचाऱ्याला अधिकार नाही. तो कधी स्वीकारायचा हा अधिकार नोकरी देणाऱ्याचा असतो. अशा प्रकरणांत कोर्टालाही आदेश देण्याचा अधिकार नसतो. नोटीस कालावधी माफ करून राजीनामा स्वीकारायचा की राजीनामा नाकारायचा हा सर्वस्वी पालिका आयुक्तांचा विशेषाधिकार आहे,’ असा युक्तिवाद पालिकेचे वकील साखरे यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी अंतरिम आदेश देताना मुंबई हायकोर्टाने अत्यंत कडक शब्दांत पालिकेला फटकारलं आहे.

हे ही वाचा :

Rutuja Latke : मनपाचा ऋतुजा लटकेंना झटका, भ्रष्टाचाराचे आरोप करत हायकोर्टात युक्तिवाद सुरूच

Rutuja Latke : कोर्टाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया…

मोठी बातमी Andheri bypoll Election ! ऋतुजा लटकेंचा उमेदवारीचा मार्ग मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version