Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. ऋतुजा लटके यांनी मनपा कार्यालयात जाऊन राजीनाम्याचं पत्र घेतले. अखेर त्यांना त्यांच्या संघर्षाचं फळ मिळालं आहे. हे राजीनाम्याच पत्रं मिळाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी समाधान व्यक्त करत मुंबई महापालिकेचेही आभार मानले.त्यानंतर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा : 

Andheri By Poll Election 2022 : माणुसकी विरुद्ध खोके सरकार – आदित्य ठाकरे

तर, दुसरीकडे अंधेरी पूर्वची जागा शिंदे गट लढवणार की भाजप हा तिढा आता सुटला असून मुरजी पटेल यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही जागा आता शिंदे गटाला न जाता या ठिकाणी भाजप निवडणूक लढणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल हा सामना रंगणार आहे.

Code Name Tiranga : १०० रुपयांत पहा, परिणीती चोप्रा-हार्डी संधूचा ‘कोडनेम तिरंगा’ आज पासून सर्वत्र चित्रपटगृहात

सध्या अंधेरीत मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. ठाकरे गटाच्या बाजूने शक्तिप्रदर्शनात आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. तर भाजप पक्षाकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनात आशिष शेलार आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर सहभागी झाले आहेत. अंधेरी पोटनिवडणुका भाजपकडून मुरजी पटेल थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या सोबत शिंदे गटाचेही काही मंत्री हजर आहेत. तर, ठाकरे गटाच्यावतीने ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली असून देखील थोड्याच वेळात अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Rutuja Latke : अखेर BMC ने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला

Exit mobile version