spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधीच ठाकरेंना धक्का, ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली, तरी त्यांच्यासमोर एक प्रशासकीय अडचण निर्माण झाली आहे. ऋतुजा लटके ह्यापूर्वी महापालिकेच्या कर्मचारी होत्या. त्यांनी महिन्याभरापूर्वीच आपल्या प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. जोपर्यंत लटके यांचा राजीनामा अर्ज मंजूर होत नाही, तोवर त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा अर्ज त्वरीत मंजूर करण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते पालिका आयुक्तांसह सामान्य प्रशासन विभागाच्या भेटीगाठी घेत आहेत.

Diwali 2022 : धनत्रयोदशी म्हणजे काय ? जाणून घ्या पूजा विधी

दोन्ही गटाचे नवे चिन्ह आणि नाव मतदारांपर्यंत किती जोमाने पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर शिंदे गटाकडून आता नवी खेळी खेळली जात असून ठाकरे गटाचा उमेदवार आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा : 

लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर आणि आजारांवर ‘हा’ रामबाण उपाय

ऋतुजा लटके यांचा राजीमाना अर्ज मंजूर केला नाही तर, उद्धव ठाकरेंसाठी हि धक्कादायक बाब ठरू शकते. आता त्यांच्यासमोर नवी अडचण निर्माण झाली असून महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा अद्याप मंजूर न झाल्याने त्यांच्या उमेदवारीसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत.

लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर करावा यासाठी शिवसेना नेते अनिल परब, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि सामान्य प्रशासनचे सह आयुक्त मिलिन सावंत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर व्हावा, अशी मागणी केल्याची माहिती मिळत आहे.

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

ऑनलाइन वस्तू खरेदी करताना फसवणूक होते?, ग्राहकांनी अशी घ्या काळजी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss