spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Andheri East Bypoll Result 2022 : ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित; अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर ठाकरे गटाचीच सत्ता

शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यामुळे मोठी वाताहात झाली होती. त्यातच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप व शिंदे गट आमनेसामने आले होते. पण, अंधेरीतील वारे पाहता भाजपने माघार घेतली.

शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यामुळे मोठी वाताहात झाली होती. त्यातच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप व शिंदे गट आमनेसामने आले होते. पण, अंधेरीतील वारे पाहता भाजपने माघार घेतली. नव्या चिन्हासह पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेनं दणदणीत विजयाकडे वाटचाल केली आहे. ऋतुजा लटके यांनी विक्रमी आघाडी घेतली असून विजय निश्चित मानला जात आहे.

हे ही वाचा : Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन महिन्यांपासून ज्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे वातावरण तापलं होतं, अखेर त्याच पोटनिवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीदरम्यान भाजपवर उमेदवार मागे घेण्याबाबतचा दबाव वाढल्यानंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला होता. पण या पोटनिवडणुकीच्या रणांगणात भाजप उमेदवार असता तर ही निवडणूक अटीतटीची ठरली असती. भाजपने उमेदवार मागे घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. तरीही भाजप वगळता इतर उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध ना ठरता मतदान झालं. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचाच विजय जवळपास निश्चित झालाय. ऋतुजा लटके यांना मतमोजणीच्या चौदाव्या फेरी अंती ४५ हजार २१८ मतं मिळाली आहेत.

राज्यात कधी नव्हे ते पहिल्यांदाच एखाद्या पोटनिवडणुकीत राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. त्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल जवळपास आता स्पष्ट झाला आहे. आतापर्यंत एकूण १३ फेरींचा निकाल हाती आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पण, दुसरीकडे इतर उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त लोकांनी पसंती दिली आहे. ऋतुजा लटके या १३ व्या फेरीमध्ये ४५२१८ मत घेऊन आघाडीवर आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत बरेच ट्विस्ट आले. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई महापालिकेत कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला, पण त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. अखेर हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेला ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. पण अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तशी विनंती केली. त्यानंतर भाजपने आपला उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं. त्यामुळे आता लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा :

CM Eknath Shinde: शिंदे गट पुन्हा गुवाहटीला जाणार? नेमकं शिजतंय काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss