Anil Deshmukh: तुरुंगा बाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Anil Deshmukh: तुरुंगा बाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

अनिल देशमुख (Anil Deshmukh) तुरुंगाबाहेर आले आहेत. एक वर्ष आणि दोन महिन्यानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांचे कुटुंबिय तुरुंगाबाहेर आले होते. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही आले होते. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील (Jayant Patil), सुप्रिया सुळे (Supriya Sule), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा समावेश आहे. अनिल देशमुख बाहेर येणार, हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्याशिवाय आर्थर रोड तुरुंगाबाहेर (Arthur Road Jail) कार्यकर्ते जमले होते. देशमुख यांच्या नागपूर येथील घराबाहेरही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आत्तापर्यंत अटक झालेली आहे. तीन वेळा त्याला सस्पेंड (suspend) करण्यात आलं आहे. एनआयएनं त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. त्यामुळं त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही” परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, “अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप माध्यमांनी दिलेल्या बातम्यांवर आधारित आहेत. त्यांच्याविरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.

माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, अशा पद्धतीचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांचा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला यासाठी मी त्यांचं मनःपूर्वक आभार मानतो. तसेच राष्ट्रवादीचे आमचे सर्वैच्च नेते शरद पवार आणि आमचे वरिष्ठ सहकाऱ्यांनी वेळोवेळी यानिमित्तानं पाठींबा दिला आणि सहकार्य केलं यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद, अस यावेळी देशमुखांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांना भारताचं संविधान भेट दिलं तसेच भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणाही दिल्या.

हे ही वाचा:

PM Modi Mother Health मोदींच्या मातोश्री विषयी खासदार राहुल गांधींचे भावुक ट्विट

कल्याण डोंबिवली पालिकेच्या ठेकेदारानेंच केली वीज चोरी

PM kisan samman nidhi fund शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, ‘या’ तारखेला २,००० रुपयांचा निधी होणार प्राप्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version