spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shyam Manav यांचे BJP वर गंभीर आरोप; Anil Deshmukh यांचा दुजोरा

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव (Shyam Manav) यांनी एक मोठा गौप्य्स्फोट केला असून राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. श्याम मानव यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. आज (बुधवार, २४ जुलै) पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी देशातील ईडीसारख्या (ED) यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो ते सांगितले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांनी दुजोरा देत श्याम मानव यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे सांगितले आहे.

श्याम मानव यांनी केलेल्या दाव्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सयाम मानव यांनी केलेलया दाव्यात तथ्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडं एका व्यक्तीच्या माध्यमातून चार प्रतिज्ञापत्र पाठवली होती. ती त्यांनीच लिहून दिली होती. मात्र, मी माझया भूमिकेवर ठाम होतो. कोणावरही खोटा आरोप करणार नाही असं मी ठणकावून सांगितलं होत,” असे देशमुख यावेळी म्हणाले.

श्याम मानव यांच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अश्यातच आता अनिल देशमुख यांनीदेखील याला दुजोरा दिला असल्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

काय म्हणाले श्याम मानव?

श्याम मानव यांनी पत्रकारांशी बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेचे उदाहरण देत सांगितले कि, “अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडे काहीच नव्हतं. सुरुवातीला त्यांच्यावर करण्यात आलेला १०० कोटींचा आरोप नंतर सव्वा कोटींवर आला. प्रत्यक्षात त्याचाही काही पुरावा मिळाला नाही. न्यायालयानेही नंतर हेच सांगितलं. मात्र, तरीही त्यांना अटक झाली. कारण, त्यांनी सत्ताधाऱ्यानी लिहून दिलेल्या चार प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यास नकार दिला होता,” असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांना सहीसाठी दिलेली प्रतिज्ञापते कोणती याची माहिती दिली. ते म्हणाले, “पहिल्या प्रतिज्ञापत्रात लिहिल्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचे आदेश दिले. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन या मुळावर बलात्कार केला आणि तिचा खुन केला. तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांनी अनेक घोटाळे केले आहेत. तर चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांनी देवगिरी बंगल्यावर बोलवून त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या उपस्थितीत गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचे आदेश दिले होते, “असे गंभीर आरोप केले होते.

“या चार प्रतिज्ञापत्रांवर सही केल्यास तुम्हाला ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळेल असं देशमुख यांना सांगण्यात आलं. देशमुख यांनी खूप विचार केल्यानंतर सही करण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा एक ऑफर देण्यात आली. अजित पवारांबद्दल बोलणं शक्य नसेल तर इतर तीन प्रतिज्ञापत्रांवर सही करून द्या. त्यांनी साही केली असती तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब आज जेलमध्ये असते,” असे मानव यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

खासदार प्रणिती शिंदेंनी संसदेत केला सवाल उपस्थित, दोन्हीकडे भाजप सरकार, मग आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही?

तर आज Uddhav Thackray, Aditya Thackeray जेलमध्ये असते; Shyam Manav यांचा खळबळजनक दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss