अनिल देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती

अनिल देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. मात्र तरीही अनिल देशमुख कोठडीतच राहणार आहेत. सीबीआयच्या (CBI) मागणीमुळे अजून १० दिवस तरी अनिल देशमुखांची सुटका होणार नाही. मात्र तरीही अनिल देशमुख कोठडीतच (custody) राहणार आहेत. सीबीआयच्या मागणीमुळे अजून १० दिवस तरी अनिल देशमुखांची सुटका होणार नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अनिल देशमुखांना जामीन दिल्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान दिलं आहे. सीबीआय आता या विषयी पुढे दाद मागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी आता १० दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जामीनाचा आदेश स्थगित करावा, अशी मागणी सीबीआयने केल्याची माहिती देशमुखांचे वकील अनिकेत कदम यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावलर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. तेरा महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे, मात्र सध्या अनिल देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस देशमुखांचा मुक्काम तुरुंंगातच असणार आहे.

अनिल देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुखांना उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाने जामिनावर १० दिवसांची स्थगिती दिली आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना देशमुखांचं पासपोर्ट प्रशासनाकडे जमा करणे, पुढील तपासात सहकार्य करणे अशा अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे पुढचे १० दिवस अनिल देशमुख यांना तुरुंंगातच राहावं लागणार आहे.

Exit mobile version