spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनिल जयसिंग प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांचा अप्रत्यक्ष निर्देश

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या पत्नीला म्हणजेच अमृता फडणवीस यांना लाज देण्या प्रकरणी पोलिसानी अनिल जयसिंह ह्यांना आज अटक केली आहे

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या पत्नीला म्हणजेच अमृता फडणवीस यांना लाज देण्या प्रकरणी पोलिसानी अनिल जयसिंह ह्यांना आज अटक केली आहे ह्यावरून आता राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले आहे . त्यात आता आदित्य ठाकरे ह्यांनी अनिल जयसिंघ हे कोणत्या क्षाराचे आहे असा अप्रत्यक्ष टोमणा मारला आहे. आता हे वक्तव्य त्यांनी कोणाबद्दल केले असावे ह्यावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
मधल्या काळात अनिल जयसिंग हे मातोश्रीवर गेल्याचा फोटो वायरल झाला होता ,त्यावरून ह्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस ह्यांनी केला आहे. त्यावर उत्तर देत असताना आदित्य ठाकरे म्हणाले कि अनिल जयसिंग मातोश्रीवर आल्याचं सर्वानी बघितलं पण त्यांना मातोश्रीवर कोणी आणलं हे सुद्धा माहित आहे, आणि ते कोणत्या शहराचे आहेत हेसुद्धा तपासा . आता हा अप्रत्यक्ष निर्देश कोणाकडे होता ह्याची चर्चा राजकीय वर्तुळात फिरत आहे.

अनिल जयसिंग प्रकरण
एका केसमध्ये मदत मागण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Latest Posts

Don't Miss