“त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर” सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाजांबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

“त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर” सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाजांबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. दरम्यान, यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सामनाच्या संपादकीयमधून (Saamana Editorial) आपली भूमिका मांडली आहे. “त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत,” असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. ”छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.” असे विधान अजित पवार यांनी करताच भाजपपुरस्कृत धुळवड संघटनांनी गदारोळ सुरू केला. संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले, असं सामनातून म्हणण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

संभाजीराजांना स्वराज्य व धर्मरक्षणासाठी शेवटी हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांनी यातना सहन केल्या, मरण पत्करले; पण मोगलांशी तडजोड केली नाही. त्यामुळे स्वराज्य व धर्मरक्षणासाठी संभाजीराजांनी केलेला त्याग व शौर्याचे वर्णन करावयास शब्द नाहीत. हा शौर्याचा व धर्मरक्षणाचा वारसा संभाजीराजांनी आपल्या राजश्री आबासाहेबांकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतला. दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपाळ भट अग्निहोत्री महाबळेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. संभाजीराजे म्हणतात, ”राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हांस अगत्य.” याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

Urfi Javed – Chitra Wagh वादात आता फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंची उडी; केले ‘या’ महिलांचे फोटो शेअर

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा फटका बसला आरोग्य सेवेला

Savitribai Phule Jaynti 2023, सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांची कारकीर्द

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version