Sunday, September 29, 2024

Latest Posts

दिवाळीनिमित्त शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याच अनुसंघाने महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेशन कार्ड धारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळी गिफ्ट आणले आहे. शिधापत्रिका धारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज मिळणार आहे. रवा, चणाडाळ, साखर आणि तेल यांचे प्रत्येकी एक-एक किलोचे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात मिळणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांची दिवाळी गोड जाणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करणार आहे. तब्बल एक कोटी ६२ लाख ४२ हजार शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. त्यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे ५०० कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज ४ ऑक्टोबर पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

१०० रुपयांत नेमकं काय काय मिळणार?

एक किलो साखर
एक किलो रवा
एक किलो चणाडाळ
एक किलो तेल

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय.

शिधापत्रिकाधारकांना मिळणार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज. १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ. रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत देणार – (अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)

आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार (मदत व पुनर्वसन विभाग). पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार (गृह विभाग). नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता (नगर विकास विभाग). भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग). उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा (जलसंपदा विभाग).

हे ही वाचा:

देशातील राजकारण्यांची झोप उडवणाऱ्या सत्ता पालटावरचं ‘महासत्तांतर’ प्रकाशित

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

Follow Us

Latest Posts

Don't Miss