Vande Bharat Express संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

Vande Bharat Express संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

वंदे भारत एक्सप्रेस हा भारत सरकारचा भारतीय रेल्वे अंतर्गत आगामी प्रकल सुरु आहे. सध्या या वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) निर्मिती ही लातूरमधील रेल्वे कारखान्यात केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला असला तरी कोणत्याही मोठ्या प्रकल्पातील रेल्वे गाड्यांची बांधणी अद्यापही होऊ शकलेली नाही. मात्र आता वंदे भारतची निर्मिती या कारखान्यात सुरू होणार आहे. लातूरसह चेन्नई, सोनीपत, रायबरेली येथे वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती केली जाणार आहे. अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

आज रेल्वे मंत्री अश्विनी (Ashwini Vaishnaw) वैष्णव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळेस त्यांनी भारतीय रेल्वेचा वंदे भारत एक्सप्रेस या आगामी प्रकल्पावर भाष्य केले आहे. तेव्हा अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना सांगितलं की, “अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील १२७२ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, नवी दिल्ली, कानपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, अहमदाबाद आणि लखनौसारख्या मोठ्या रेल्वे स्थानकासह पुरी, जोधपूर, गांधीनगर आणि जयपूरमधील लहान मोठ्या रेल्वेस्थानकांचा कायापलट करण्याच येणार आहे”.तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायड्रोजन ट्रेनबद्दल देखील भाष्य केले आहे. हायड्रोजन ट्रेशन संदर्भात बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की “आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी हायड्रोजन ट्रेनची सुरुवात डिसेंबर २०२३ मध्ये करण्यात येणार आहे. या ट्रेनची सुरुवात डिसेंबर २०२३ मध्ये करण्यात येणार आहे. ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन आहे.”असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

हायड्रोजन ट्रेन (hydrogen train) संदर्भात अधिक माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की “कालका ते शिमला या हेरिटेड सर्किट मार्गावर पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. त्यानंतर देशातील प्रमुख पर्यटन ठिकाणांवर ही ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रामायण सर्किट, जगन्नाथ सर्किट, काशी विश्वनाथ सर्किट या मार्गांवर देखील भारत गौरव ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. त्याच बरोबर या वर्षी बुलेट ट्रेनच्या (bullet train) कामावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

अदानी एन्टरप्राइसेसचा ‘एफपीओ’ रद्द, गुंतवणूकदारांना सर्व पैसे परतवणार

तीच तीच डाळ खाऊन कंटाळा आलाय?, तर बनवा साऊथ इंडियन स्टाईल रस्सम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version