spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेना ठाकरे गटाला अजून एक मोठा धक्का

आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबिर पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला.

आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबिर पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे .

काही लोक स्वार्थासाठी पक्षात येतात आणि स्वार्थासाठी निघून जातात. त्यांच्या निघून जाण्यानं शिवसेनेला कोणताही धक्का बसला नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) या शिवसेना ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत बोलत होते. त्यांचा शिवसेनेशी तसा संबंध नव्हता असेही राऊत म्हणाले. स्वार्थी लोकांना ओळखण्यात आमची चूक झाली आहे. गेल्या अनेक वर्षात ही चूक झाल्याचे मी वारंवार सांगितल्याचे राऊतांनी सांगितले. यापुढे काळजी घेतली जाईल असे राऊत म्हणाले. अशा लोकांना पक्षात प्रवेश दिला तरी त्यांना जबाबदारीची कोणतीही पदे देऊ नयेत असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत मी चर्चाही करत असतो असे राऊत म्हणाले. यापुढे प्रत्येक नाणं हे वाजवून घेतलं जाईल असे राऊत म्हणाले. कवडीची किंमत नसलेली काही लोकं असतात. ती आमच्याकडं येतात. मोराचा पिसारा त्यांना लावला जातो. मग तो पिसारा नाचवत ती लोकं तिकडं जातात असेही राऊत म्हणाले.

काही अतृप्त आत्मे स्वार्थासाठी जात असतील असे वक्तव्य करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आमदार मनिषा कायंदे यांच्यावर टीका केली. विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असलेले, परत आमदारकी मिळणार नसल्याने प्रवेश करत असतील असे विनायक राऊत म्हणाले. विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे करणार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे. भाजपकडून २००९ ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या . त्यानंतर २०१२ साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१८ साली त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली होती. मनीषा कायंदे ते फिरते चषक, किशोरी पेडणेकर यांची मनिषा कायदेंवर टीका केला.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमधून लढवणार निवडणूक ???

कर्जत दिशेने जाणाऱ्या लोकलचे ५ डबे घसरले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss