spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे गटाच्या आणखी एका आमदाराला अँटी करप्शन ब्युरोची नोटीस

शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यानंतर आता ठाकरे गटाच्या आणखी एका आमदाराला एन्टी करप्शन ब्युरोकडून नोटीस मिळाली आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता राजन साळवी (Rajan Salvi) यांना अँटी करप्शनची नोटीस आली आहे. या नोटिसीमध्ये मालमत्तेसंदर्भात उल्लेख केला आहे. ५ तारखेला अलिबाग येथील अँटी करप्शन कार्यालयात हजर राहण्याचा उल्लेख या नोटिमध्ये केला आहे.

ठाकरे गटातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा – राजापूर – साखरपा या विधानसभा मतदारसंघातील राजन साळवी हे आमदार आहेत. मागच्या काही दिवसांपासून ते शिंदे गटात जाणार, अशी चर्चा देखील सुरू होती. पण राजन साळवी यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. शिवाय त्यांच्या वरती दबाव टाकला जात आहे. पण राजन साळवी कुठेही जाणार नाहीत. ते मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या वतीनं त्यांनी यापूर्वीच दिली होती. पण सध्या अँटी करप्शन ब्युरोची आलेली नोटीस आणि मागच्या काही राजकीय घडामोडी, चर्चा यामुळे मात्र सध्या आलेल्या नोटिशीवरून विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

याआधी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. वैभव नाईक यांनी यापूर्वीच अँटी करप्शन कार्यालय रत्नागिरीला मेल करत यापूर्वीच वेळ मागून घेतला आहे. वैभव नाईक यांनी त्यानंतर कुडाळ इथल्या अँटी करप्शन कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर निलेश राणे यांनी काढलेल्या संविधान बचाव रॅलीमध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे नेते देखील सहभागी झाले होते. यावेळी वैभव नाईक यांच्यावर सरकार दबाव आणू पाहत आहे, असा आरोप देखील ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.

या साऱ्या घडामोडी घडत असताना आता राजन साळवी यांना देखील अँटी करप्शनची नोटीस आली आहे. या नोटिशीमध्ये त्यांना ५ डिसेंबर रोजी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या नोटिशीनंतर राजन साळवी यांची प्रतिक्रिया अद्याप तरी मिळू शकलेली नाही.

हे ही वाचा : 

अब्दुल सत्तारांवर कार्यवाहीसाठी राज्यपालांनी पाठवलं मुख्यमंत्र्यांना निवेदन

Mumbai जमावबंदीबद्दल विश्वास नागरे पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण

सोनम कपूरने केला तिच्या मुलाबद्दल मोठा खुलासा, म्हणाली

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss