Friday, September 27, 2024

Latest Posts

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव, दिग्विजय सिंह शशी थरूर यांना टक्कर देताना दिसणार?

शशी थरूर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ते ३० सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी ही लढत रंजक होताना दिसत आहे. याआधी जिथे सीएम अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांच्यात काँटे की टक्कर असल्याचे मानले जात होते, तिथे आता या पदासाठी आणखी एका नावाची भर पडली आहे. बुधवारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह देखील या निवडणुकीत उतरू शकतात अशी बातमी समोर आली आहे. जरी ही बातमी समोर आली असली तरी दिग्विजय सिंह यांनी ३० सप्टेंबर रोजी याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगानंतर गेहलोत अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवतील याबाबत साशंकता आहे.

दिग्विजय सिंह शशी थरूरांना देणार का टफ फाईट?

दिग्विजय सिंह अध्यक्षपदासाठी उभे राहिल्याने स्पर्धा चुरशीची होणार आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आधीच राजकीय वादळात अडकले आहेत. या संदर्भात आज ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दिग्विजय सिंह यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते दोनदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. गांधी घराण्यातील सर्वात निष्ठावान नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. ते प्रत्येक व्यासपीठावरून आरएसएस, भाजप आणि हिंदुत्वाच्या विरोधात आवाज उठवत असतात. याशिवाय दिग्विजय सिंह यांना संघटनात्मक आणि प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. मात्र, यापूर्वीही असे प्रसंग आले आहेत की, दिग्विजय सिंह यांची काही विधाने त्यांच्याच पक्षासाठी अडचणीची ठरली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांना जनतेचा पाठिंबाही कमी आहे. ते आता पूर्वीसारखे प्रसिद्ध राहिले नाहीत. अशा स्थितीत शशी थरूर यांचे पारडे किती जड जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अध्यक्षपदासाठी ‘ही’ नावं आहेत चर्चेत

काँग्रेस अध्यक्षपदाचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आली आहेत. शशी थरूर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ते ३० सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय मुकुल वार्सनिक, मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल यांचीही नावे चर्चेत होती. आता त्यात दिग्विजय सिंह यांचेही नाव जोडले गेले असून, याला मंजुरी मिळाल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा:

‘देवदूत बस घोटाळाप्रकरणी’ मोठा खुलासा, लाखांची बस केली करोडोत खरेदी, फडणवीसांनी घेतली दाखल

पीएफआयवर बंदी घालण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही- असदुद्दीन ओवैसी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss