spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Saffron Project : नागपूरचा अजून एक प्रकल्प महाराष्ट्र बाहेर; सुप्रिया सुळेंसह आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले आहेत. सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा सी-२९५ लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट (Tata Airbus Project) हा नागपूरमध्ये (Nagpur) होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला आहे. अशातच आता आणखी एक नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला (Hyderabad) गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र, हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळं हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. यावर शिवसेना नेते आणि युवासेने प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आदित्यठाकरे यांनी ट्विट करून, दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेले आहेत, त्यासाठी खोके सरकार जबाबदार आहे असं ट्विट मध्ये म्हटलं आहे.

तर गुंतवणूकदारांचा राजकीय स्थिरतावरील विश्वास उडाला आहे. हवामान संकटाच्या वेळी शेतकऱ्यांचा सरकारच्या पाठिंब्यावरचा विश्वास उडाला आहे. अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु आहे. यातच आता आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने संताप व्यक्त होतोय. खा. सुप्रिया सुळे यांनी यामागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचं सूचक विधान केलंय. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प परराज्यात जात आहेत. पुण्याच्या तळेगाव येथे होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर टाटाचा एअरबस प्रकल्प जो नागपूरमध्ये होणार होता, तोदेखील गुजरातमधल्या वडोदऱ्याला गेला. आज पुन्हा एक प्रकल्प हैदराबाद येथे गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन यांचा विमान इंजिन दुरुस्ती आणि देखभालीचा प्रकल्प नागपूर येथे होणार होता. परंतु हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे.

एकामागून एक असे प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ”आम्ही प्रकल्प आणले, असं सांगून त्यांनी यादी दिली. परंतु ते प्रकल्प कुठल्या काळामध्ये आले, हे पाहिलं पाहिजे. जुन्याच प्रकल्पांची यादी देणं हास्यास्पद आहे.” असं सुळे म्हणाल्या. ”मोठे प्रकल्प राज्याबाहेर जातात, ही गंभीर बाब आहे. पुढच्या वेळेला यापेक्षा मोठा प्रकल्प आणू, असं सांगून लॉलिपॉप दिलं जातंय. तेही प्रकल्प आणा आणि हेही प्रकल्प टिकवा.” असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.

हे ही वाचा :

व्हिडीओ होतोय व्हायरल; भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची मुलांबरोबर शर्यत

सोमालिया हदरले; प्राणघातक कार बॉम्बस्फोटात १०० लोक ठार, ३०० जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss