ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार कमी

२०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक समीकरणे बदलली आणि मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या.

ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार कमी

२०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक समीकरणे बदलली आणि मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा अजित पवारांनी त्यांचा गट तयार करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर राज्यातील राजकारणात वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांना बसणारे धक्के काही कमी होत नाही. शिवसेनेमधील अनेक नेते त्यांची साथ सोडत आहेत. वर्षभरातआधी एकनाथ शिंदे यांना ४० आमदार सोडून गेले. त्यानंतर राज्य अन् जिल्हापातळीवर अनेक नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिवसेना ठाकरे गटातून त्या एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्या. मुंबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. मोदी यांनी राम मंदिराची उभारणी, कलम ३०७ कलम हे प्रश्न सोडवले. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेऊन मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पुढे नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सुषमा आंधारे यांचे महत्व उद्धव ठाकरे यांच्या गटात वाढल्यामुळे आपण नाराज झाल्या का? या प्रश्नावर त्यांनी नकार दिला. माझी भूमिका विकासाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकास होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अनेक जण आपल्यापद्धतीने अर्थ लावत आहेत. त्यांना समाधान मान् द्या. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे जात आहे. त्यात राज्याचा वाटा असला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे मी आज नीलम गोऱ्हे यांचे पक्षात स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आता आपणास महिलांसाठी मुक्तपणे काम करता येईल असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

शरद पवारांच निवडणूक आयोगाला पत्र, पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का दिली नाही?

भाजपकडून शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न? शिंदे-फडणवीस यांची रंगली तब्ब्ल एक तास बैठक…

Chandrayan Launch, ‘या’ दिवशी अवकाशात झेप घेणार Chandrayan 3

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version