spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाची बीडमध्ये उत्तर सभा?

शरद पवारांनी जाहिर केल्याप्रमाणे काल बीडमध्ये सभा घेण्यात आली होती. या सभेत अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आणि आमदार, खासदार उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची काल बीडमध्ये (Beed) स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. याआधी येवल्यात शरद पवारांची सभा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp’s Congress) फुटीनंतर शरद पवारांनी जाहिर केल्याप्रमाणे काल बीडमध्ये सभा घेण्यात आली होती. या सभेत अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आणि आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सभेला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

शिंदे-फडणवीस सरकारला सोबत झाालेल्या बैठकीत अजित पवारांनी भाष्य केले होते. त्यावेळी त्यांनी ‘आम्हीही पक्ष बांधला, आम्हालाही लोक ऐकतात. आम्हीही नेते आहोत. जर पवार साहेबांनी सभा घेतल्या, तर मलाही प्रत्युत्तर म्हणून सभा घ्यावी लागेल.’ असे म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले होते.

शरद पवारांच्या या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गट येत्या 27 तारखेला बीडमध्ये उत्तर सभा आयोजित करण्याची शक्यता आहे. सभेमध्ये भाष्य करताना शरद पवारांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. यासभेनंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक बळीराम गवते यांनी असा दावा केला आहे की ‘शरद पवारांची ही सभा तालुकास्तरीय होती. अजित पवार (ajit pawar) यांनी वेळ दिल्यास 27 तारखेला उत्तर सभा घेणार आहोत. या सभेपेक्षा चार पटीने कार्यर्त्यांची गर्दी आमच्या सभेला होईल.’

तसेच यावेळी बोलताना बळीराम गवते यांनी बबन गित्ते यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरही टिपणी केली. परळी मधील बबन गित्तेंचा प्रवेश आमच्यासाठी पर्याय नाही. मुंडेंनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. संपूर्ण बीडमधील जनता मुंडे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे बबन गित्ते यांच्या प्रवेशाने धनंजय मुंडे यांना काहीही फरक पडणार नाही’, असे स्पष्ट वक्तव्य बळीराम गवते यांनी केले.

हे ही वाचा:

बीडमध्ये शरद पवारांनी घेतली जाहीर सभा, सभेत जितेंद्र आव्हाड म्हणाले…

अमित शहांचा मोठा प्लॅन, यूपी, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रातील…

संदीप क्षीरसागर यांनी सांगितली शरद पवारांसंदर्भात त्यांची भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss