spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“कुठलेही फोटो…” भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक एक वक्तव्य केले आहे आणि त्यांच्या या वक्तव्यांमुळे हळू हळू वाद निर्माण होत आहे. या सर्व प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक एक वक्तव्य केले आहे आणि त्यांच्या या वक्तव्यांमुळे हळू हळू वाद निर्माण होत आहे. या सर्व प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांनी “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठिकठिकाणी भुजबळांचा निषेध केला गेला. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. “”कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. ते बुधवारी (२८ सप्टेंबर) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. “या स्वामीनारायण मंदिराच्या भूमिपूजनालाही मी आलो होतो. मी मुख्यमंत्री असताना मला संधी मिळाली हा योगायोग आहे. त्यासाठी मी खूप समाधानी आहे. तीन वर्षात हे भव्यदिव्य मंदीर निर्माण झालं. हे एक मोठं काम स्वानारायण मंदिराबाबत झालं आहे,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. एकनाथ शिंदे म्हणाले, “कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल. त्यांना वाटेल ते आम्ही करणार नाही. जे लोकांना वाटतं तेच आम्ही करणार आहोत.”

आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असं विधान केलं. मात्र यावेळी त्यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा उल्लेख केला. “शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं वादग्रस्त विधान छगन भुजबळ यांनी केलं.

हे ही वाचा:

सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का ?, नाना पाटोलेंचं व्यक्तव्य

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळणार ७८ दिवसांचा पगार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss