spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांना आम्ही तोडले आहे”, भाजप नेत्याचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर बिहारमध्येही राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झाले आहे. मात्र, महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर भाजपचे बळ वाढले होते. परंतु बिहारमध्ये भाजपाला सत्तेबाहेर जावे लागले आहे. त्यामुळे बिहार भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांना त्यांचं राष्ट्रीय जनता दल व काँग्रेससोबतच सरकार कोसळणार आहे आणि तेही 2025 पूर्वीच कोसळेल, असा इशारा दिला आहे. त्याचा बरोबर त्यांनी महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना का फोडली याचा मोठा खुलासा केला आहे.

नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत जनता दल युनायटेड आणि राजदप्रणित महागठबंधन यांचं संयुक्त सरकार नवे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावर सुशील मोदी यांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेचं उदाहरण दिले पुढे त्यांनी म्हटलं की, “आम्ही कोणताही मित्रपक्ष तोडत नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांना आम्ही तोडले आहे. जसे की महाराष्ट्र. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले.” असे सुशील मोदी म्हणाले.

सुशील मोदी म्हणाले, “नितीश कुमार म्हणतात आमच्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी 40 आमदार पाहिजे आहेत. त्यांच्या पक्षाला भाजपाने फोडलं असतं तरी सरकार स्थापन झालं असतं का? आम्ही का त्यांचा पक्ष फोडू? त्यांच्या 44-45 आमदार होते तेव्हा आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले. या आधी आम्हाला काही करायचं असतं तर आम्ही तेव्हाच फोडाफोड केली असती. मात्र, भाजपाने कधीही आपल्या मित्रपक्षाला धोका दिलेला नाही. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांचाच पक्ष आम्ही फोडला. असा दावा सुशील मोदी यांनी केला.

हेही वाचा : 

‘शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे’, देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

Latest Posts

Don't Miss