spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे यांच्या कडून कोल्हापूर वासियांना आवाहन

सध्या चाललेल्या कोल्हापूर येथील राड्यामुळे कोल्हापूर शहरात वादंग निर्माण झाले आहे. त्याचबरोबर कोल्हापूरात दोन गटात तुफान राडा झाला आहे.

सध्या चाललेल्या कोल्हापूर येथील राड्यामुळे कोल्हापूर शहरात वादंग निर्माण झाले आहे. त्याचबरोबर कोल्हापूरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. काही मुलांकडून सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक पुकारली. या बंदला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमले. यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. सध्या शहरात तणाव असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच कोल्हापूर मध्ये बंदीची घोषणा देखील केली आहे.

कोल्हापूरमधील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलतोय, ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वतः अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. तसेच राज्यात शांतात व सुव्यवस्था चे पालन करण्यासाठी सरकारकडून आदेश देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडून लाठीचार्ज करावा लागेल असा वागू नये असे देखील एकनाथ शिंदे यांच्या कडून सांगण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘राज्यात कायदा सुवव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सरकारचे आहे. सगळ्या नागरिकांनाही कायदा राखण्याचे आवाहन करतो. सगळ्यांनी सहकार्य करावे. मी सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी गृह विभाग घेत आहे. स्वतः गृहमंत्रीदेखील या प्रकरणात जातीने लक्ष घालून आहेत. कायदा मोडणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,’ असंही ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss