spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंडखोरी केल्यानंतर त्यांना सध्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंडखोरी केल्यानंतर त्यांना सध्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेत झालेली ही बंडाळी आतापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी ठरलीय. नगरसेवकांपासून ते खासदारांपर्यंत अनेकजण एकनाथ शिंदेंना जाहीर पाठिंबा देत आहेत. या सर्व पार्श्ववभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्याकडून आता राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.

उद्धव ठाकरेंनी नुकत्याच तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना प्रमोशन मिळालं आहे. तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके (Liladhar Dake) यांच्या मुलावर ठाकरेंनी महत्त्वाची जबाबदारी सोपवलीय. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे पडझड झालेला शिवसेनेचा किल्ला आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा बांधायला सुरुवात केली आहे. या नियुक्तींमुळे उद्धव ठाकरेंकडून निष्ठावंतांची विशेष काळजी घेतली जात असल्याचं पहायला मिळत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant), आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके (Parag Liladhar Dake) यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात अली आहे.

हे ही वाचा :-

आज रंगणार भारत – पाकिस्तान ‘महामुकाबला’

गुलु गुलु ओटीटी रिलीज:ऑनलाईन हा सिनेमा नक्की कुठे आणि कसा पाहावा?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss