spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“तुमच्या निवडणुका आणि पाडणं ही प्रायोरिटी आहे का?” Pravin Darekara यांनी जरांगेंना विचारला प्रश्न

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत असल्याचे आपण पहिले आहे. हे मराठा आरक्षण मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजासाठी करत आहेत. सुरुवातीच्या काळात जेव्हा हे आरक्षण समोर आणून उपोषण केले होते त्यावेळी त्यावर त्वरित निकाल लागला होता. त्यांनतर त्यांनी ‘सगेसोयरे’ अध्यादेशसाठी त्यांनी पुन्हा मागणी केली होती. मराठा आंदोलक आज शनिवारी २० जुलैपासून पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनी याबाबतची या आधीच घोषणा केली होती. त्यानुसार जालन्याच्या अंतरवली सराटी इथे ते उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण द्यावे ही त्यांनी मागणी आहे. सरकारने निर्णय घ्यावा यासाठी त्यांनी अल्टिमेटमही दिले होते. सरकाने चर्चा करून त्यांना आश्वासनही दिले होते. पण अजूनही त्यात काही होत नाही या पार्श्वभूमीवर त्यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असून त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जरांगे यांनी केलेल्या टीकेला प्रवीण दरेकर यांनीही उत्तर दिलंय. दरेकर मराठे संपवण्यासाठी अभियान राबवणार आहेत जरांगेंच्या या आरोपाला उत्तर देताना दरेकरांनी म्हटलं की, जरांगेंकडून एकच अपेक्षा की त्यांनी राजकारण करू नये. फक्त फडणवीस, भाजप आणि सरकारवर टीका करतात. मात्र पवारसाहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर बोलायचं नाही याचा काय अर्थ? 

दरेकर म्हणाले की, आमची जरांगेंकडून एकच अपेक्षा की त्यांनी राजकारण करू नये. बाकी मराठा समाजाचे विषय, प्रश्न यासाठी लढावं. सर्व पक्षाचे मराठा समाजाचे लोक त्यांच्या पाठिशी उभा राहिले. पण कुणाचा तरी अजेंडा आहे. फक्त फडणवीस, भाजप, सरकार यांच्यावर टीका करतात. पवार साहेब, उद्धव ठाकरे, काँग्रेसवर बोलायचं नाही याचा अर्थ काय? असा प्रश्नही दरेकरांनी विचारला.

सरकार काही करत नाही का? सरकार चर्चेला तयार आहे. सरकार सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. उपोषणाला अंतरवालीत बसणार, ठराविक दिवस उपोषण, ठराविक दिवस दौरा. मग मतदारसंघाची आखणी, कुणी कुणाला उभा करायचं, कुणाला पाडायचं. तुमचा फोकस हा मराठा समाजाच्या प्रश्नांपासून दूर जातोय हे मी त्यांना जाणवून दिलं असंही दरेकरांनी सांगितलं. तुमच्या निवडणुका आणि पाडणं ही प्रायोरिटी आहे का? राजकारण करायचंय तर फुल टाइम राजकारण करा. राजकारणाचं पांघरुण घेऊन मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका. ते आमचे दुश्मन आहेत का? आजपर्यंत आम्ही सोबत आहोत. आंदोलनाला राजकीय वास यायला लागलाय, मराठा आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही सोबत आहे. राजकारणाचा वास येतोय. तेवढा प्रश्न त्यांनी सांभाळावा अशी विनंती दरेकरांनी जरांगेंना केली.

हे ही वाचा:

DHARMVEER 2 TRAILER LAUNCH च्या वेळी DEVENDRA FADNAVIS यांनी केल्या भावना व्यक्त..

DHARMVEER 2 TRAILER LAUNCH : धर्मवीर ट्रेलर लॉन्चवेळी क्षितिज दाते म्हणाला, प्रवीण तरडे यांच्यावर सरस्वती प्रसन्न…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss