विधानभवनात मान्यवरांसमोर नारायण राणेंनी आणि नीलम गोऱ्हें यांच्यात वाद

विधानभवनात मान्यवरांसमोर नारायण राणेंनी आणि नीलम गोऱ्हें यांच्यात वाद

हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम राबवण्यात आले होते. मुख्य म्हणजे सोमवारी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार , शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. तसेच यावेळेस मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांसह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सोमवारी विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति असणारे मनोगत आणि भावना या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केल्या. पण या दरम्यान यावेळेस केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात वाद झाल्याचे आढळून आले. हा संपूर्ण प्रकार नारायण राणे यांच्या भाषणादरम्यान घडला आहे.

नेमकं झालं अस की सोमवारी विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होत असताना. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळे नारायण राणे यांनी त्यांना कशाप्रकारे मानसिक त्रास देण्यात आला , याबाबत बोलायला सुरूवात केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे सभागृहातून थेट बाहेर पडले. नारायण राणे यांनी छगन भुजबळ यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा छगन भुजबळ यांनी नारायण राणे यांना हात दाखवून निघून गेले. पण राणे यांच्या भाषणावर नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. औचित्यभंग केल्याचा आरोप करत भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर नारायण राणे यांनी ‘मी नाही थांबणार’ असं म्हटलं. “मी बसून बोलणाऱ्यांची ऐकत नसतो”, असा टोलाही राणे यांनी गोऱ्हे यांना लगावला. त्यावर नीलम गोऱ्हे या आक्रमक झालेल्या दिसल्या.

हे ही वाचा:

कशातही मन एकाग्र होत नाही, लक्ष थाऱ्यावर नसते तर, हे उपाय नक्की करून बघा

शरीर फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात सॅलेडचा समावेश करा आवर्जून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version