शिंदे यांना केवळ नमस्कार म्हणणारे, अर्जुन खोतकर आता शिंदे गटाच्या वाटेवर

शिंदे यांना केवळ नमस्कार म्हणणारे, अर्जुन खोतकर आता शिंदे गटाच्या वाटेवर

अर्जुन खोतकर आता शिंदे गटाचाच वाटेवर

नवी दिल्ली : मराठवाड्यातील शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात शामिल होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. खोतकर आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याचा व्हिडिओ आणि काही फोटो समोर येत आहे. या भेटी नंतर नेमके काय घडणार याची उत्सुकता जनतेसह राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. यापूर्वी मराठवाड्यातील 9 आमदार आणि 1 खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता जालना मधील स्वतःला पक्षनिष्ठ म्हणवून घेणारे अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे सामोर येत आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे व अर्जुन खोतकर यांची नवी दिल्लीत भेटी झाली होती. या भेटी दरम्यान अर्जुन खोतकर यांनी शिंदेना नमस्कार केला होता. या गोष्टीचा खुलासा अर्जुन खोतकर यांनी केला. खोतकर म्हणाले, ” मी व्यक्तिगत कामाकासाठी चार दिवस दिल्लीत होतो. दिल्लीत असताना महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री शिंदे आणि माझी समोरासमोर भेट झाली. दोघांत नमस्कार झाला. नमस्कार करणे ही आपली संस्कृती आहे. राज्याचे मुख्यमंत्री समोर आल्यानंतर नमस्कार करायचा नाही का? या सहज घडलेल्या भेटीनंतर माध्यमांत माझ्याबद्दल अफवा सुरू झाल्या. मात्र, असा कोणताही प्रकार झाला नाही, होणार ही नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक असून आयुष्यभर शिवसेनेत राहणार आहे”.असे खोतकरांनी म्हटले होते.

हेही वाचा : 

चंद्रकांत पाटलांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात हजर राहणार

Exit mobile version