spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अब्दुल सत्तारांच्या प्रयत्नांना यश, अर्जुन खोतकरांचा शिंदेंना पाठींबा

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आज जालनातील राहत्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधाल

जालना : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आज जालनातील राहत्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधाल यात त्यांनी, शिंदे गटात सह्भागी होणार असल्याच्या निर्णय जाहीर केले आहे. खोतकर या संदर्भात घोषणा करताना भावूक झाले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या परवानगीने, कुठुंबासाठी मी हा निर्णय घेतोय, हे सांगताना त्यांचे डोळे अश्रुनी भरून आले होते. गेल्या आठ दिवसांपासून शिवसेना नेते अर्जुन खोतकर दिल्लीत होते. तोपर्यंत त्यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्याबाबत कोणतीही निर्णय घेतल्याचे स्पष्ट वक्तव्य केले नव्हते. जालन्यात गेल्यावरच मी या बाबत स्पष्ट भूमिका मांडेन, असे त्यांनी म्हटले होते. जालन्यातील साखर कारखान्याविरोधात ईडीची जी कारवाई सुरु आहे, ती अडचण दूर होईल की नाही माहिती नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी, हा कारखाना सुरु करण्यासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी दिलेय. त्यामुळे आजपासून मी त्यांना समर्थन जाहीर करतो. माझ्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देतोय, असे वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केले आहे.

अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेतील प्रवासाला दिला उजाळा  

खोतकर म्हणाले, ” तसेच 1989-90 मध्ये मी पहिल्यांदा शिवसेनेकडून आमदार झालो. आजतागायत प्रामाणिकपणे मी पक्षाची सेवा केली. यामध्ये मी एकटाच नाही तर सर्व सहकारी या सर्वांनी मिळून जालना जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन वाढवले आहे. सामान्य माणसांपर्यंत घेऊन गेलो आणि सामान्य माणसानेही तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा यात लोकांनी आमच्या पदरात यश टाकलं. त्याबद्दल मी लोकांचे आभारी आहे असे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

हेही वाचा : 

राज्यपालांच्या विधानाबाबत मुख्यमंत्री शिंदे केंद्र सरकारला पत्र लिहणार

Latest Posts

Don't Miss