Raj Thackeray यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, परळी कोर्टात राहणार हजर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President President Raj Thackeray) यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे.

Raj Thackeray यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, परळी कोर्टात राहणार हजर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President President Raj Thackeray) यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट बजावलं होतं. हे वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे हे आज परळी कोर्टात राहणार आहे असे सांगितलं जात आहे. त्यामुळे आज कोर्टात नक्की काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे परळी कोर्टाने जारी केलेलं अटक वॉरंट रद्द करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता परळी कोर्टात हजर राहणार आहेत. त्यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणी राज ठाकरे कोर्टात वारंवार गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी १० वाजता पांगरी येथील गोपीनाथ गडावर हेलिकॉप्टरने जाणार आहेत. त्यानंतर ते सकाळी ११ वाजता कोर्टात हजर राहणार आहेत. त्यांचं कोर्टाचे सर्व काम आटोपल्यानंतर ते मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनेचा आढावा घेणार आहेत. तसेच यावेळी ते त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना देखील देणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे साधारण दुपारी १. ३० च्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या बीड दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच राज ठाकरे यावेळी मीडियाशी संवाद साधणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे यांना ऑक्टोबर २००८ साली मुंबईत अटक झाली होती. राज ठाकरे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी परळीच्या धर्मपुरीत बसेसवर प्रचंड दगडफेकही केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू झाली होती. ३ आणि १२ जानेवारी रोजी राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.परंतु राज ठाकरे हे कोर्टात हजर राहिले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी दोषारोप पत्रही कोर्टात सादर केलं आहे. मात्र राज ठाकरे प्रत्येक तारखेला गैरहजर राहिल्याने अखेर त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं.

हे ही वाचा:

IBPS SO Result 2023 आईबीपीएस एसओ भरती परीक्षेचा निकाल जाहीर, या पद्दतीने करा डाउनलोड

राशी भविष्य, दिनांक १८ जानेवारी २०२३, तुमचा मित्र परिवार तुम्हाला संकटसमयी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version