अरविंद केगरीवाल यांचा खळबळजनक दावा;भाजपने मला गुजरात निवडणूक न लढवण्याची ऑफर दिली

अरविंद केगरीवाल यांचा खळबळजनक दावा;भाजपने मला गुजरात निवडणूक न लढवण्याची ऑफर दिली

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी गैप्यस्फोट केला आहे. त्यांनी सांगितल की भाजपने मला गुजरात निवडणूक न लढवण्याची ऑफर दिली आहे. मला सांगण्यात आलं होत की गुजरात निवडणूक लढवू नका. सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना चौकशीच्या फेऱ्यातून त्यांना बाहेर काढतो.

अरविंद केरीवाल यांनी भाजपवर आरोप केला आहे की, भारतीय जनता पक्षाने आधी मनीष सिसोदिया यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, आता ते मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पक्षाला सोडून दिल्लेचे मुख्यमंत्री बनण्याचा भाजपचा प्रस्ताव मनीष सिसोदिया यांनी नाकारला होता. ते म्हणाले, ”गुजरात सोडून निवडणूक न लढवल्यास ते मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध सुरु असलेला केंद्रीय यंत्रणांचा तपास बंद करतील. तसेच त्यांच्यावरील सर्व आरोप हटवले जातील.” ही ऑफर तुम्हाला कोणी दिली असं त्यांना विचारलं असता, केजरीवाल म्हणाले की, ”मी माझ्या कोणाचे नाव कसं घेऊ शकतो, हा प्रस्ताव त्यांच्याकडून आला होता. ते (BJP) कधी सरळ संपर्क करत नाही. ते एकाकडून दुसऱ्या मित्राकडे जातात आणि त्यांच्या माध्यमातून संदेश पाठवतात.”

अरविंद केजवरील पुढे म्हणाले आहेत की, दिल्लीत एमसीडी निवडणुका एकाचवेळी घेऊन केजरीवाल यांना घेरल्याचे दिसत नाही. तर यावरून भाजप घाबरल्याचे दिसत आहे. ते म्हणाले की, दोन्ही जागा जिंकण्याचा आत्मविश्वास असता तर त्यांनी असा आग्रह धरला नसता. भाजपला गुजरात आणि दिल्ली एमसीडी निवडणुकीत पराभव होण्याची भीती आहे, म्हणून त्यांनी दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्याची खात्री केली आहे. दरम्यान, गुजरात निवडणुकीत भाजपला आप कडवे आव्हान निर्माण करत असल्याचं चित्र आहे.

हे ही वाचा :

Cyrus Mistry: सायरस मिस्त्री प्रकरणात मोठी घडामोड; अनहिता पंडोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Bigg Boss Marathi 4: महेश मांजरेकर आज संपूर्ण आठवड्यातील स्पर्धकांची अक्कड उतरवणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version