Sunday, July 7, 2024

Latest Posts

Maharashtra Drought: राज्यात परिस्थिती भयाण मात्र CM Eknath Shinde सुट्टीवर: Arvind Sawant

महाराष्ट्र सध्या दुष्काळ (Maharashtra Drought) आणि पाणीटंचाईच्या (Water Shortage in Maharashtra) परिस्थितीमुळे होरपळून निघत आहेत.

महाराष्ट्र सध्या दुष्काळ (Maharashtra Drought) आणि पाणीटंचाईच्या (Water Shortage in Maharashtra) परिस्थितीमुळे होरपळून निघत आहेत. राज्यातील काही गावांमध्ये भीषण परिस्थिती असून सामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अश्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या महाबळेश्वर येथील मूळगावी गेले होते. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. अश्यातच आत शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते आणि खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी, “मुख्यमंत्री आणि यांचं पूर्ण शिष्टमंडळाची फेलीयर असून हे बेपरवाह सरकार आहे,” असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

यावेळी अरविंद सावंत म्हणाले, “हे बेपरवाह सरकार आहे. देशातील सर्वांधिक अन्यायकारक राज्य असेल तर तो महाराष्ट्र आहे. जेव्हा महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा देखील देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या सीमेवरुन परत गेले. त्यांनी मदत केली नाही. त्यांना जनतेची अजिबात काळजी नाही, राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे यांना कशाची पर्वा नाही. जनतेची पर्वा न करणारं सरकार या महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्री आणि यांचं पूर्ण शिष्टमंडळाचे हे फेलीयर असून हे बेपरवाह सरकार आहे,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाबळेश्वर येथील दरे या त्यांच्या मूळगावी आहेत. आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून त्यांनी हि माहिती दिली. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

आव्हाडांना कॉपी करण्याची गरज नव्हती, Ramdas Athawale यांचा आव्हाडांवर घणाघात

Loksabha Elections चा आज सातवा टप्पा, PM Modi यांची मतदारांना विनंती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss