‘दिवार’मध्ये अमिताभच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ जसं गोंदलं होतं तसं, संजय राऊतांचा हल्लबोल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray group MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यातील सरकार हे खोके सरकार आहे.

‘दिवार’मध्ये अमिताभच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ जसं गोंदलं होतं तसं, संजय राऊतांचा हल्लबोल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray group MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यातील सरकार हे खोके सरकार आहे. शिवसेनेतून फुटलेले हे गद्दार आहेत. त्यांच्या माथी गद्दारीचा कलंक कायम राहील, असं सांगतानाच दिवारमध्ये अमिताभच्या हातावर लिहिलं होतं मेरा बाप चोर है, तसा गद्दारीचा शिक्का फुटलेल्या आमदारांच्या कपाळावर कायमचा बसला आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने आज पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले की, कुठल्याही गावात जा गद्दारांना खोकेवाले आले, असं म्हटलं जातंय. त्यामुळे फुटलेल्या आमदार-खासदारांचं काहीच भवितव्य दिसत नाही. वैजापूरच्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या, असं संजय राऊत म्हणाले.

मी गद्दार किंवा खोकेवाल्यासांठी पत्रकार परिषद घेतली नाही. यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. जसं दिवार सिनेमात अमिताभच्या हातावर होतं, मेरा बाप चोर है. अमिताभच्या हातावर गोंदलं होतं, मेरा बाप चोर है, तसं यांचे नातेवाईक, यांचे पोरं यांच्या बायका यांना उद्या लोकं म्हणती हे गद्दारांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्या न पिढ्यांना ही गद्दारी शांतपणे बसू देणार नाही, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला. खोके म्हणजे खोकेच. गद्दारच आहेत ते. लोकं म्हणताहेत त्यांना खोकेवाले. बच्चू कडूंनीही लोक काय म्हणतात ते सांगितलं. काल वैजापूरच्या फुटलेल्या आमदाराला लोकांनी केवळ चपला मारायचं ठेवलं होतं. त्यांना गावातून काढलं होतं. जे शिवसेनेतून फुटलेले आहेत. त्यांचं भविष्य चांगलं दिसत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

सुरक्षेच्या बाबतीत बोलतांना राऊत म्हणाले, यांनी आमच्या सुरक्षा काढल्या पण काहीही फरक पडत नाहीत. त्यांनी स्वतःच्या सुरक्षा काढून बघाव्यात मग कळेल महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ती. असं म्हणून संजय राऊत यांनी जतमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेल्या पाण्याबद्दलही विधान केलं. त्या पाण्यात सरकारने जलसमाधी घ्यावी, असं राऊत म्हणाले. कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडलं आहे.

शिवसेना डॅमेज झालीय. शिवसेना फूट पडली असं वाटतं, तसं काही झालं नाही. एखाद दुसरा आमदार गेला म्हणजे पक्ष गेला असं होत नाही. पक्ष जमिनीवर आहे. सर्व पदाधिकारी मला भेटून गेले. पक्षात सर्वजण काम करत आहेत, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात निवडणुका का टाळता हे कळत नाही. महापालिका निवडणुकाही घेत नाही. भीतीपोटीच निवडणुका टाळत आहेत. कधीही निवडणुका घ्या शिवसेना पहिल्या पेक्षा जोमानं, नवीन चिन्हावर… मशाल असेल तर मशाल… बरं का आम्हाला चिंता नाही. नव्या चिन्हावरही शिवसेना विजयी होईल. लोकांमध्ये चीड आहे. ती उफाळून बाहेर येईल. शिवसेनेला कुठेही तडा गेला नाही, असा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा : 

नाशिकमध्ये संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी

Akshaya Hardeek Wedding : आता हार्दिक अक्षयाला रोज म्हणणार “चालतंय की”… पहा #अहा वेडिंग फोटो

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version