spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजप विरोधात हल्लाबोल

काही दिवसांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली दोन गट निर्माण झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटातून मोठ्या प्रमाणत पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. पण आता ठाकरे गटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणत इनकमिंग दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कर्मवीर भाऊसाहेब हिरे (Karmaveer Bhausaheb Here) यांचं मोठं योगदान आहे. त्याच हिरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार असलेले अद्वय हिरे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांच्या हाती शिवबंधन बांधले.

हिरे कुटुंब संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अग्रेसर राहीलं आहे. त्यांच्या राजकीय अस्तित्वाला दादा भुसे (Dadaji Bhuse)यांनी काही वर्षांपूर्वी सुरुंग लावलं होतं. त्यामुळे दादा भुसे यांच्या विरोधातील भविष्यातील ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे असल्याचे स्पष्ट झाले. नाशिकमध्ये दादा भुसे यांना चांगला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा माजी आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. माझ्या मतदारसंघात भाजपचे अस्तिव नव्हते. ते आम्ही निर्माण केले. मात्र ५० गद्दार भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. त्यानंतर भाजपला आमची गरज राहीली नाही. माझ्या मतदार संघात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मात्र भाजपने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. जो पक्ष शेतकऱ्यांना वाचवू शकत नाही त्या पक्षाचा मी त्याग केला.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, २००९ साली स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी मला भाजपात लोकसभेत निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपात काम करतोय.. भाजपात मी गेलो तेव्हा भाजपला सगळे सोडून जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा राजकारणात सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत अमृतभाई पटेल (Amritbhai Patel) यांना पाडून आम्ही भाजपा भक्कम केल्याची आठवण अद्वय हिरे यांनी सांगितली. उद्धव ठाकरे यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “बरं झाले गद्दार गेले, त्यामुळे हिरे सापडले. हिरेंनी सांगितलेला भाजपचा त्रास २५ ते ३० वर्ष आम्ही भोगला आहे. आम्ही त्यांना पालखीत बसून फिरवले. मात्र बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली ती भाजपची पालखी वाहण्यासाठी नाही. हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली आहे.”

हे ही वाचा:

राग आल्यामुळे रणबीरने फेकला चाहत्याचा फोन, सोशल मीडियावर चाहत्यांनी केले ट्रोल

भारतात पुन्हा चित्ते येणार, नामिबीयानंतर साऊथ आफ्रिकेशी झाला करार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss