गर्दी नसल्याने खुर्च्या उचलण्याची वेळ आली; अंबादास दानवे यांची शिंदे गटावर खोचक टीका

गर्दी नसल्याने खुर्च्या उचलण्याची वेळ आली; अंबादास दानवे यांची शिंदे गटावर खोचक टीका

शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी शिवराळ भाषेत वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उमटली आहे. अशातच सत्तारांचा मतदारसंघ असलेल्या औरंगाबादमधील सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहील, असा दावा सत्तारांनी केला होता. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गर्दी जमल्याने सत्तारांच्या दाव्यातली हवा निघाली आणि चालू भाषणातच खुर्च्या उचलण्याची वेळ आली. यावर ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करून अब्दुल सत्तारांच्या सभेला टीका केली आहे.

आंबादस दानवेंनी सत्तार यांच्या सोमवारच्या सभेतील व्हिडीओ शेअर करत सभेला गर्दी नसल्याने खुर्च्या उचलण्याची वेळ आली असा टोला लगावला आहे. सुप्रिया सुळेंबद्दल कॅमेरासमोर वादग्रस्त विधान करणाऱ्या सत्तार यांची काल औरंगाबादमधील सिल्लोय येथे सभा होती. सत्तारांच्या मतदारसंघामधील या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. या सभेला लाखो लोकांची गर्दी असेल असा दावा सत्तार यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात उलटं चित्र या सभेत दिसून आलं. भाषण सुरु असतानाच रिकाम्या खुर्च्या उलचण्याचं काम सुरु करण्यात आलं. भाषण सुरु असताना मंचावरुन रिकाम्या खुर्च्या दिसू नये म्हणून खुर्च्या उचलून बाजूला ठेवण्यात आल्या.

सभेला अपेक्षित गर्दी न जमल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाच व्हिडीओ विधान परिषदचे विरोधी पक्षनेते असलेल्या आंबादास दानवेंनी शेअर करत सत्तार यांना टोला लगावला आहे. “मैदान भरले नाही म्हणून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चालू भाषणात खुर्च्या उचलण्याची वेळ काल रात्री आली. लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली? लोकांना भाषण आवडलं नसेल कदाचित,” अशा कॅप्शनसहीत दानवेंनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. सभा सुरु असतानाच उपस्थितांपैकी अनेकजण मैदानातून बाहेर पडू लागले तेव्हा मंचावरुन सत्तार यांनी ओरडून सभा संपेपर्यंत कोणीही मैदानाबाहेर पडू नये असं सांगितलं. मात्र त्याचा लोकांवर फारसा परिणाम झाला नाही.

हे ही वाचा :

Guru Nanak Jayanti 2022 : गुरू नानक मक्केच्या दिशेने पाय ठेवून झोपले तेव्हा काय झाले? जाऊन घ्या कथा

राज ठाकरेंची नेत्यांना सूचना; ‘या’ चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version