spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘केजरीवाल यांनी संपूर्ण देशात मुस्लिमांची बदनामी केली’, ओवेसींनी केजरीवालांना फटकारले

गुजरात निवडणुकीच्या (Gujarat election 2022) मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे शब्दांचे बाण अधिक तीव्र होत आहेत. गुजरात निवडणुकीत पहिल्यांदाच लढणाऱ्या असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल करताना ओवेसींनी त्यांना छोटा रिचार्जही म्हटले. गुजरात निवडणुकीदरम्यान ओवेसी यांनी केजरीवालांवर आरोप केला की, त्यांनी कोरोनाच्या काळात मुस्लिमांना बदनाम करण्याचे काम केले होते.

हेही वाचा : 

‘पचताओगे’ गाण्याच्या चित्रीकरणाच्या आठवणीत ‘झलक दिखला जा १०’च्या शोमध्ये नोरा फतेही रडली ; पहा तेव्हा काय झालं

ओवेसी म्हणाले की, तुम्ही काँग्रेसला एक संधी दिली आणि नंतर दुसरी संधी दिली, जेव्हा ती तिसऱ्यांदाही कुचकामी ठरली तेव्हा त्यांनी आपला छोटासा रिचार्ज दाबला. एआयएमआयएमच्या प्रमुखांनी केजरीवाल(Arvind kejriwal) यांना लबाड म्हटले आहे. ते म्हणाले की, या व्यक्तीने संपूर्ण देशात मुस्लिमांची बदनामी केली. जेव्हा देशात कोविड सुरू झाला, तेव्हा सर्वप्रथम त्यांनी मुस्लिमांना बदनाम करण्याचे काम केले. तबलिगी जमातची बदनामी झाली. जहांगीरपुरीमध्ये गोंधळ घातला असता त्यांनी तेथे बुलडोझर फिरवला.

पुढे ओवेसी म्हणाले की, बिल्किस बानोच्या मुद्द्यावर केजरीवाल यांचे तोंड उघडत नाही. समान नागरी संहितेवर ते काहीही बोलत नाहीत. ओवेसी म्हणाले की, कोविडच्या पहिल्या लाटेत केजरीवाल यांनी तबलिगी जमातला सुपरस्प्रेडर म्हटले होते. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने त्यांचे खोटेपणा सिद्ध केले.

माजी मुख्यमंत्री ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर आजही ‘वर्षा’च्या प्रेमात?

दिल्लीतील प्रत्येक आठवा मतदार मुस्लिम आहे

विशेष म्हणजे दिल्लीत जवळपास १२ टक्के मुस्लिम मतदार आहेत, त्यामुळे प्रत्येक आठवा मतदार मुस्लिम आहे. दिल्लीतील विधानसभेच्या ७० पैकी ८ आणि महानगरपालिकेच्या २५० जागांपैकी सुमारे ५० जागांवर मुस्लिम मतदार महत्त्वाची भूमिका बजावतात. बल्लीमारन, सीलमपूर, ओखला, मुस्तफाबाद, चांदनी चौक, मतिया महल, बाबरपूर, दिलशाद गार्डन आणि किरारी हे मुस्लिमबहुल क्षेत्र आहेत. या भागातील नगरसेवकांच्या जागांवर ४० ते ९० टक्के मुस्लिम मतदार आहेत. याशिवाय त्रिलोकपुरी आणि सीमापुरी भागातही मुस्लिम मतदार खूप महत्त्वाचे मानले जातात.

सुषमा अंधारे भेटणार ‘या’ शिंदे गटाच्या आमदारला

Latest Posts

Don't Miss