spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पण तुम्ही पंचतारांकित हॉटेलात जाऊन बसला होता, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर केला पलटवार

यावेळी मुंबई ही मुंबईकरांना जिंकायची आहे... भाजपा मुंबईकरांसाठी लढणार आहे!

आज गोरेगावात झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर अगदी सडकून टीका केल्या.तसेच त्यांनी महाराष्ट्रातील वेदांत प्रकल्पाबाबतही भाष्य केले आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, नोकऱ्या चालल्या आहेत, वेदांत गेला त्याच्याबद्दल धांदात खोटे बोलत आहेत. तो प्रकल्प पुन्हा आणा. एकेक उद्योग निघून जात आहेत. मिंधे फक्त शेपट्या हलवून होय महाराजा म्हणत आहेत. महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीत का बोलत नाही. सांगा की पंतप्रधानांना हा प्रकल्प कसा काय गेला, म्हणजे हे अगोदरच ठरले होते. आम्ही तुमच्या सोबत आहे , आणा प्रकल्प परत असे देखील उद्धव ठाकरे यावेळेस म्हणले आहेत. महापालिका जिंकण्यासाठी हा विषय नाही. शिवसेना ही गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून तळागाळातील लोकांसाठी काम करते आहे. नैसर्गिक आपत्तींना सामोरी गेली आहे. प्रत्येकवेळेला धावून जातो तो शिवसैनिक असतो.

उद्धव ठाकरेंच्या याच टीकेला आता आशिष शेलारंनी प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार म्हणाले,

२६ जुलैच्या पुरात मुंबईकरच मुंबईकरांसाठी झटत होते, हे खरे आहे.पण आज त्या दाहक आठवणींचे भाषण करणारे. २६ जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना मातोश्रीत सोडून स्वत: पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले होते.. त्याचे काय?

२६/११ च्या हल्ल्यात पण मुंबईकर मुंबईकरांसाठी जातपात, पक्ष न बघता मदत करत होते.
नरिमन हाऊस, ताज या परिसरात आमचा कमलाकर दळवीसुद्धा मदत करत होता. आज भाषण करणारे मातोश्रीच्या बाहेर आले होते का?

बॅण्ड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचविताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा कार्यकर्ता भाजपाचा होता. जेव्हा त्याने केलेले धाडस चर्चेत आले तेव्हा हा आमचा कार्यकर्ता आहे असे सांगत हे घरी पोहचले.

कोरोनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मा. एकनाथ शिंदे पीपीई घालून रुग्णालयात जाऊन रुग्णांना धीर देत होते… तेव्हा तुम्ही घरी बसला होतात…

स्थलांतरीत मजूरांना अन्नधान्य वाटपापासून गरिबांना भाज्या, धान्य वाटणारे शेकडो भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला कसे दिसणार?

तुम्ही घरी बसलात होतात! मुंबईचा ताळेबंद मांडायचा झाला तर बरेच मुद्दे मांडता येतील आणि महापालिकेचा ताळेबंद मांडायचा तर सत्ताधीशांच्या भ्रष्टाचाराचे पारडे जड ठरेल. हिशेब होणारच आहेत सगळ्याचे…

ते आम्ही नाही मुंबईकर करणार आहेत. मुंबई जिंकायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह येणार म्हणून तुम्ही ठरवलंत आणि तुम्ही आधीच घाबरून गेलात की काय?

अहो, यावेळी मुंबई ही मुंबईकरांना जिंकायची आहे… भाजपा मुंबईकरांसाठी लढणार आहे!

मुंबईकरांना बदल हवाय…

मुंबईकरांचं ठरलंय!

म्हणून काही जणांचं पित्त खवळलंय!!

उद्धव ठाकरेंनी आज त्यांच्या भाषणातून अनेकांवर टीका केली आहे. त्यामुळे आता येत्या काळात इतर विरोधकांकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 हे ही वाचा:

दिल्लीत घुमणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आवाज, राज्यप्रमुखांच्या मेळाव्याला शिंदे संबोधणार

हिंदूसह मुस्लिम बांधव करतात पाकिस्थानातीत या देवीचा पूजा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss