spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई भाजपाचे अध्यक्षपदी आशिष शेलार, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

मुंबई : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर 9 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आला. यानंतर आता खातेवाटपा या बाबत  प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्यात या प्रकरणी चर्चा सुरु असताना, भाजप त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप नेते व नवनियुक्त मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपने याची अधिकृत घोषणा केली. चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती तर आमदार आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती ही तत्काळ प्रभावानं लागू करण्यात आल्या आहेत.

आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मागे झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे आगामी निवडणूक लक्षात घेता पुन्हा एकदा आशिष शेलार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बाजी मारली आहे. एक ओबीसी चेहरा आणि विदर्भाचा चेहरा यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदासाठी संधी मिळाली असल्याची चर्चा आहे. याच बावनकुळेंना या आधी विधानसभेचे तिकीट नाकारले होतं. त्यानंतर आता त्यांना विधानपरिषद आमदारकी मिळाली आणि आता प्रदेशाध्यक्षपद मिळाले.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बावनकुळें यांची प्रतिक्रिया

म्हणाले,”माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिल्याने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपच्या संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाचं तसेच देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. या जबाबदारीतून पुढच्या काळात मला सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील नंबर वन पक्ष असलेला भाजप आणखी पुढे कसा नेता येईल तसेच शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा पोहोचवता येईल, याचा प्रयत्न करणार. अशी भावना बावनकुळेंनी व्यक्त केली.

हेही वाचा : 

दादरमध्ये शिंदे गटाचे प्रति सेनाभवन उभारले जाणार, सदा सरवणकरांनी दिली माहिती

Latest Posts

Don't Miss