Thursday, September 26, 2024

Latest Posts

मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांचे हाल, Ashish Shelar यांचा Aaditya Thackeray यांना टोला

मुंबई आणि परिसरात काल (बुधवार, २५ सप्टेंबर) झालेल्या धुवाधार पावसामुळे मुंबई ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईची लाइफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे तीनतेरा वाजले. मुंबई आणि ठाण्यात काहि ठिकाणी पाहणी साचल्यामुळे नागरिकाना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागले. यावरून शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज (गुरुवार, २६ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावरून आता भाजप (BJP) मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरेंवर चांगलीच आगपाखड केली आहे.

“आदित्य ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेने मागिल २५ वर्षात जी निकृष्ठ दर्जाची कामे केली त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत असून काल जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत,” अशी भूमिका आशिष शेलार यांनी आज येथे मांडली. तर “संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजिनामा द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली.

काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, “‍उबाठा सेनेने गेल्या पंचवीस वर्षात मुंबई महापालित सत्तेत असताना जी कामे केली ती निकृष्ठ दर्जाची आहेत. ब्रिमस्टोवॅड हा प्रकल्प वेळेत पुर्ण झाला नाही. हजारो कोटी खर्च करुन पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ते उभी करु शकले नाहीत. गेल्या एक दोन वर्षांच्या कामावर कालची परिस्थिती उद्भवली नाही तर गेल्या पंचविस वर्षांतील निकृष्ठ दर्जाची कामे त्याला जबाबदार आहेत. जगविख्यात डॉ. अमरापूकर यांचा जो गटारात पडून मृत्यू झाला त्याचे आधी पापक्षालन करा, असेही ते म्हणाले.

शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “संजय राऊत यांनी एका महिलेची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळे महिलेची बदनामी करणाऱ्या या व्यक्तीला रश्मी ठाकरे यांनी सामनाच्या कार्यकारी संपादक पदी ठेवू नये. तर त्यांनाही राज्यसभेच्या सदस्य पदी राहण्याचा अधिकार आहे का? त्यांनी राजिनामा दिला पाहिजे,” असे आशिष शेलार यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, “काल काही मिनिटांच्या पावसात मुंबई, पुणे, ठाण्यातील लोकांचे हाल झाले. अर्ध्या एक तासाचा पावसात मुंबई ठप्प झाली. २००५ साली ९०० मिलीमीटर पाऊस झाला होता. काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवेदेखील ठप्प झाला. रेल्वे ठप्प झाल्या. असे असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कुठे होते? मुख्यमंत्री मुंबई खड्डेमुक्त करणार होते. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. पण अर्धा किलोमीटरदेखील काम पूर्ण नाही. मुख्यमंत्री पत्रकारांना विचारत होते काही पाणी भरा है क्या? आणि पाणी भरलं. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खात आहे त्याद्वारे प्रशासन सुरू आहेत. एवढे घटनाबाह्य मुख्यमंत्री कोणी बघितले नसेल,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss