Andheri By Poll Election 2022 : “…पक्षाचं नाव बदलून ‘रडकी सेना’ असं ठेवावं” आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Andheri By Poll Election 2022 : “…पक्षाचं नाव बदलून ‘रडकी सेना’ असं ठेवावं” आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. आज ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचले आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारचा खोके सरकार म्हणून उल्लेख केलाय. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचं नाव बदलून रडकी सेना असं ठेवावं. सत्तेत असताना केंद्र सरकारच्या नावानं रडत होते. आता विरोधी पक्षात असताना कधी न्यायालयाच्या नावानं, कधी निवडणूक आयोगाच्या नावानं रडतात. उद्या अंधेरीत पराभूत झाला तर अंधेरीच्या जनतेच्या नावानं रडतील त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ही रडकी सेना आहे असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव-आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

हेही वाचा : 

Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आम्ही जिंकूच – चंद्रशेखर बावनकुळे

पुढे आशिष शेलार म्हणाले की, मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्थानिकांचा महापूर आला आहे. आमच्यासमोर १० पक्षांना सोबत घेऊन १० तोंडाचा रावण उभा आहे. ते उपरे बाहेरून लोक बोलवतात. अनिल परब यांच्यासह बाहेरचे लोक आणि मुरजी पटेल, स्थानिक असा हा संघर्ष आहे. या निवडणुकीत भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय गटाच्या उमेदवाराचा २५-३० हजार मताधिक्यांनी विजय होणार आहे असा विश्वास शेलार त्यांनी व्यक्त केला.

ऋतुजा पटेल यांना उमेदवारी अर्जदाखल करण्यास पाठिंबा देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी इतर नेत्यासह उपस्थिती दर्शवली. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हटले, ”आज प्रत्येकाच्या मनात दुःख आहे. अशावेळी समोरुन कुणीही लढत नसतं. परंतु खोके सरकारने एका महिलेला सतावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचं काळं मन समोर आलेलं आहे. त्यामुळे आता माणुसकी विरुद्ध खोके सरकार, अशी लढाई सुरु झालीय” अशा भावना आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवल्या.

Code Name Tiranga : १०० रुपयांत पहा, परिणीती चोप्रा-हार्डी संधूचा ‘कोडनेम तिरंगा’ आज पासून सर्वत्र चित्रपटगृहात

अंधेरी पूर्वची जागा शिंदे गट लढवणार की भाजप हा तिढा आता सुटला असून मुरजी पटेल यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही जागा आता शिंदे गटाला न जाता या ठिकाणी भाजप निवडणूक लढणार आहे.मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ह्या देखील अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रावर उपस्थित रुजणार आहेत. यात भाजपचे मुरजी पटेल विरुद्ध ऋतुजा लटके असा सामना रंगणार आहे.

Exit mobile version