spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ashish Shelar : ‘राज ठाकरेंना मी परिपक्व राजकारणी मानतो’ ; ठाकरेंच्या प्रश्नाला आशिष शेलारांचं उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली. तर विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. एवढंच नव्हे तर मनसेच्या मुंबईतील दीपोत्सव कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाचारण केलं होतं. त्यामुळे मनसे, भाजप आणि शिंदे गटाची जवळीक वाढत असून त्यांची महायुती होणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु महाराष्ट्रातील बडे प्रकल्प हे गुजरातलाच कसे जातात? असा करत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. यावर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य केलं.

हेही वाचा : 

Pushpa 2: बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’मधील अल्लू अर्जुनचा खास लूक आला समोर

शेलार म्हणाले, समोर दिसलेल्या टिझरवर प्रतिक्रिया देणं यात परिपक्व राजकारण नाही. राज ठाकरेंना मी परिपक्व राजकारणी मानतो, त्यामुळं त्यांनी प्रकल्पांसंबधी जे सवाल उपस्थित केले आहेत, त्याची माहिती मी त्यांना देईन. इलेक्ट्रॉनिक विषयातील क्लस्टर पुण्यात रांजणगावला येईल तसेच चार महिन्यात जे प्रकल्प महाराष्ट्रात येताहेत, त्याचंही राज ठाकरेंनी स्वागत करावं, असंही शेलार म्हणाले.

राज ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यातील बाहेर गेला म्हणजे कुठे गेला? गुजरातला गेला. तुम्ही माझी सर्व भाषणं ऐकली असतील तर पंतप्रधान हे देशाचे आहेत. एखाद्या राज्याचे नाहीत हेच मी आधीपासून सांगत आलो आहे. पंतप्रधानांना देशातील सर्व राज्य समान असायला हवीत. त्यांनी सर्व राज्यांना मुलांसारखं समान वागवलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

सोमय्यांच्या खोट्या आरोपांनी माझ्या सासूचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; किशोरी पेंडणेकर

उद्या महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेला असता तो असामला गेला असता तर वाईट वाटलं नसतं. गुजरातला गेला. गुजरातही शेवटी देशात आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं जो प्रकल्प येतो तो गुजरातला जातो. पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावं. प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे महाराष्ट्राबाबत बोलतो त्यावेळी संकुचित कसा ठरतो? असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधानांचा विचार विशाल असावा. त्यांनी देशाचा विचार करायला हवा. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे. तिथल्या लोकांना घर सोडून जायची आणि इतर राज्यांमध्ये ओझं बनण्याची आवश्यकता नाही. असे प्रकल्प प्रत्येक राज्यात गेले तर देशाचाच विकास होईल, असंही ते म्हणाले.

NCP : राष्ट्रवादी युवक काँग्रेस संतप्त होऊन, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा केला प्रयत्न

Latest Posts

Don't Miss