spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हाताच्या कंकणाला आरसा कशाला?, शेलारांचे शिवसेनेला रोखठोक प्रत्युत्तर

आदित्य ठाकरे यांच्या तळेगाव येथील आंदोलनावर आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी टीकेचा बाण सोडला होता. आदित्य यांनी आधी किती टक्केवारी घेतली हे सांगावं, त्यांच्यामुळे वेदांत प्रकल्प बाहेर गेला आहे, असा टोला शेलार यांनी लगवाला. कुठलीही लढाई जिकण्याआधी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकिला सामोरे जावे, असेही शेलार म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेची भूमिका लोकांना भ्रमित करणारी असून मराठी – गुजरातीचा वाद आणि द्वेष निर्माण करत आहेत. चहाच्या ऐवजी आणखीन काही घ्यायचं ठरवलं आहे असं दिसतंय ते धादांत खोटं बोलत आहेत, असे शेलार म्हणाले.

हेही वाचा : 

‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात, दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप

उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळालं, यावर विचारलं असता आशिष शेलार म्हणाले की, या प्रकरणाशी आमचा काय संबंध आहे. प्रकरण शिंदे गट आणि पेग्विंन सेना मध्ये होते. त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. ज्यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तीच खरी शिवसेना आहे. असे शेलार यांनी म्हटले होते. त्यानंतर आज सामानाच्या रोखठोक मधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो, पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात… दिघे नक्की कोण होते? असा प्रश्न सामनामधून विचारण्यात आला.

सुझलॉन एनर्जीचे संस्थापक तुलसी तांती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटर हँडल वरून एक कविता सादर केली आहे. शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हाताच्या कंकणाला आरसा कशाला?, असं म्हणत शेलारांनी शिवसेनेला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.

आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जाणून घेऊया समाजावर आपली छाप सोडणाऱ्या या नेत्यांबाबत

Latest Posts

Don't Miss