निवडून येताच नवनिर्वाचीत आमदार अश्विनी जगताप यांची कमला सुरुवात , पक्षाचा आदेश येताच अधिवेशनात सामील होणार

कालच पुण्यामध्ये पोटनिवडणुकीचा (pune by poll election) निकाल जाहीर झाला सगळी कडे आजही त्याचीच चर्चा चालू आहे.

निवडून येताच नवनिर्वाचीत आमदार अश्विनी जगताप यांची कमला सुरुवात , पक्षाचा आदेश येताच अधिवेशनात सामील होणार

कालच पुण्यामध्ये पोटनिवडणुकीचा (pune by poll election) निकाल जाहीर झाला सगळी कडे आजही त्याचीच चर्चा चालू आहे. कसबा मतदार संघातून रवींद्र धंगेकर निवडून आले तर पिंपरी चिंचवड (pimpari chinchwad)मतदार संघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप ह्यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या आहेत. निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी अश्विनी जगताप ह्या कामाला लागल्याचं दिसून येत आहे. त्यांनी लक्ष्मण जगताप ह्यांच्या कार्यालयाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. त्या आज सकाळ पासूनच कार्यालयामध्ये काम सांभाळत आहेत .

अश्विनी जगताप म्हणाल्या कि , मी आज सकाळी भाऊंच्या कार्यालयात आले , सर्व जणांनी माझे चांगले स्वागत केले. आज मी भाऊंच्या जागेवर काम करत आहे त्यामुळे त्यांनी जशी माणसं जपली तशी मीही जपेल असा विश्वास त्यांनी लोकांना दिला आहे. सकाळ पासूनच कार्यालयामध्ये लोकांची गर्दी आहे. त्यावर अश्विनी जगताप म्हणाल्या कि लोक माझे अभिनंदन करायला तसेच त्यांच्या अडचणी सांगायला येत आहे . भाऊंच्या निधनानंतर त्यांना पोरक वाटत असणार त्यामुळे आता आपल्या अडचणी माझ्या कडे घेऊन येत आहे.
एवढचं नाही तर पक्षाचा आदेश आल्या नंतर मी लगेजच अधिवेशनात सामील होणार आहे , आणि तिथे जाऊन महिलांचा मुद्दा मांडणार आहे. त्यात अंगणवाडीच्या सेविकांना आणि मदतनिसांना वेतन वाढ हवी आहे . महागाईचा फटका सगळ्याच लोकांना बसत आहे . त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या वेतनाचा मुद्दा मी अधिवेशनात लावून धरणार आहे. अजून मला अधिवेशनात बोलावलं नाही परंतु शपत विधी झाल्या नंतर आणि अधिवेशनात मला बोलावलं कि मी महिलांचे अनेक मुद्दे मांडणार आहे असं देखील अश्विनी जगताप ह्यावेळेस म्हणाल्या .

त्यांचा पहिल्याच दिवशी कार्यालयात येऊन कमला सुरुवात करण हे राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहे. लोकांना देखी त्यांचा हा कामसू पण आवड आहे . लोकांना अशा आहे कि त्यांची रखडलेली काम पूर्ण होतील.ह्याचा फायदा भाजप होईल असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Exit mobile version