Assembly Elections: विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजणार जम्मूकाश्मीर पासून..

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीचे पडघम आता  वाजणार जम्मूकाश्मीर पासून..

विधानसभा निवडणुकीचे बिगुल आता लवकरात लवकर वाजणार असल्याचे दिसून येते. याची सुरुवात ही थेट जम्मू-काश्मीर पासून होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी ३ वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. ज्यामध्ये जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय, हरियाणामधील विधानसभा निवडणुकांच्या तारखाही आज जाहीर होऊ शकतात, असंही कळतंय. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. आयोगाने गेल्या आठवड्यातच जम्मू-काश्मीर आणि हरियाणाचा दौरा पूर्ण केला होता. त्यानंतर आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा करु शकते. जम्मू-काश्मीर येथे २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर, जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे. तेव्हापासून तेथील राजकीय पक्षांकडून राज्याचा दर्जा परत मिळवण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. तर, आधी निवडणुका होतील आणि मगच राज्याचा दर्जा बहाल होईल, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात होते.

जम्मूकाश्मीरच्या या निवडणूक कशा होणार आणि किती टप्प्यात ?

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तीन ते चार टप्प्यांत मतदान होऊ शकते. सप्टेंबरमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याच महिन्याच्या अखेरीस निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका घेण्याच्या मार्गातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे सुरक्षा व्यवस्था आहे. अलीकडच्या काळात या भागात अचानक वाढलेल्या दहशतवादी घटनांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम निवडणूक कार्यक्रमावरही दिसू शकतो, अशी शक्यता आहे. मतदारसंघ पूनर्रचना न झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये दीर्घकाळापासून विधानसभा निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मे २०२२ मध्ये झालेल्या मतदारसंघ पूनर्रचनेनंतर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या आता ९० झाली आहे. जम्मूमधील ४३ विधानसभेच्या जागांवर आणि काश्मीरमधील ४७ विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. २०१४ मध्ये, लडाखमधील ५ जागांसह जम्मूमधील ३७ जागा आणि काश्मीर खोऱ्यातील ४६ जागांसह ८७ विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या होत्या.

हे ही वाचा:

Atal Bihari Vajpayee Death Anniversary: वक्ते, कवी आणि एक कुशल राजकारणी म्हणून ओळखले जातात अटलबिहारी वाजपेयी…

बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ओवाळणी जमा झाल्याचे CM Eknath Shinde यांनी व्यक्त केले समाधान

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version