spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Vidhansabha Election मधील दोन निवडणूक चिन्ह गोठवली ; Sharad Pawar यांना मिळाला मोठा दिलासा

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कँग्रेस तसेच शिवसेना या गटांमध्ये चिन्हांवरून अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली व पक्ष चिन्हावरून वादही झाले. त्यावर निवडणूक आयोगाने आपला निर्णयही सुनावलं होता. त्यानंतर ही केस न्यालयात गेली होती. त्याचाच निकाल जाहीर झाला आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सूर बिघडवणाऱ्या ट्रम्पेट आणि पिपाणी म्हणजेच तुतारीवर अखेर बंदी घालण्यात आली आहे. कारण, राज्य निवडणूक आयोगानं नवे परिपत्रक काढत, ही दोन्ही मुक्त चिन्ह गोठवल्याचं जाहीर केलं आहे, त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय.

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारत १० पैकी ८ जागा जिंकल्या. पण, लोकसभेत पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीपेक्षाही अपक्ष उमेदवारांनीच जास्त हादरा दिल्याचं समोर आलं. त्याचं कारण अर्थातच तुतारीशी साम्य असणारी दोन चिन्ह, ती म्हणजे ट्रम्पेट आणि पिपाणी अर्थात तुतारी चिन्हं. पण, आता विधानसभेतही या दोन्ही चिन्हांमुळे पवारांच्या तुतारीचा सूर काही बिघडणार नाही. कारण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोगानं एक परिपत्रक काढत ट्रम्पेट आणि तुतारी चिन्ह गोठवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्यातील राज्य पक्षांच्या यातील आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ (NCPA sharad pawar group) पक्षाचा समावेश करण्यात आला असून या पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणार माणूस आहे.

एकूण किती मते मिळाली ?

लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट आणि पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसला होता. साताऱ्यात तर पिपाणीमुळे शशिकांत शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागल्याचा दावा पक्षानं केलेला. कारण शशिकांत शिंदेंना ५ लाख ३८ हजार ३६३ मते मिळाली तर भाजपच्या उदयनराजेंना ५ लाख ७१ हजार १३४ मते मिळाली. उदयनराजेंनी ३२ हजार ७७१ च्या मताधिक्यानं शिंदेंचा पराभव केला. पण, याच मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार संजय गाडेंनी तब्बल ३७ हजार ६२ मते घेतली. म्हणजे ही पिपाणीची ३७ हजार ६२ मते शशिकांते शिंदेंना मिळाली असती तर जवळपास ५ हजार मतांनी ते विजयी झाले असते.

लोकसभेत साधर्म्य असलेल्या चिन्ह आणि नावामुळे फटका बसणार हे उघड असल्यामुळेच निवडणुकीच्याआधी आणि निकालानंतरही राष्ट्रवादीनं या चिन्हांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला होता. पण, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी मान्य झाल्यामुळे विधानसभेआधी हा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगानं परिपत्रक काढत दोन्ही मुक्त चिन्ह गोठवली आहेत, त्यामुळे आता ही दोन्ही चिन्ह विधानसभेत दिसणार नाहीत. पण, पवारांच्या राष्ट्रवादीचं अजूनही पूर्ण समाधान झाल्याचं दिसत नाही, त्यामुळे आता राष्ट्रवादीची रणनीती नेमकी काय राहते? येत्या विधानसभा निवडणुकीत याचा कुणाला आणि किती फायदा मिळतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

HEAVY RAINFALL : पुढील २४ तासात कोसळणार मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज

MUMBAI HIGH COURT नं फेटाळला युक्तिवाद ; विनाअनुदानित शाळांचा RTE प्रवेशाबाबतचा अध्यादेश केला रद्द

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss