Assembly Winter Session हिवाळी अधिवेशन संपताच बजेट अधिवेशनाची तारीख झाली जाहीर, ‘या’ तारखेला होणार बजेट अधिवेशनाची

केंद्रानं दिलेल्या मर्यादा पाळून आर्थिक शिस्त सांभाळायची असते. केंद्रानं एक दंडक घालून दिलेला असतो पण तो देखील सरकार पाळणार नाही हे आत्ता स्पष्टपणे सांगता येणार नाही.

Assembly Winter Session हिवाळी अधिवेशन संपताच बजेट अधिवेशनाची तारीख झाली जाहीर, ‘या’ तारखेला होणार बजेट अधिवेशनाची

गेले काही दिवस गाजत असलेल्या हिवाळी अधिवेशनाची सांगता आज अखेर झाली आहे आणि विधानसभेचं कामकाज संपलं असून विधानपरिषदेचं कामकाज काही वेळातच संपण्याची शक्यता आहे. तसेच पुढील अधिवेशनाची तारीख देखील आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील बजेटचं अधिवेशन २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे.

अधिवेशनाबद्दल बोलत असताना “आज विधानसभेचं कामकाज संपलेलं आहे यानंतर थोड्यावेळात विधानपरिषदेचं कामकाज संपेल. यानंतर सोमवार, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी बजेटचं अधिवेशन मुंबईत घ्यायचं असं विधानसभा अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे”, अशी माहिती विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीतील पक्षांनी काही मुद्दे घरण्याचं ठरवलं होतं. यामध्ये महापुरुषांबद्दलची बेतालं वक्तव्य अंतिम आठवडा प्रस्तावात या गोष्टी मांडल्या पण यावर सत्ताधारी पक्षानं आमचं हे चुकलं हे सांगायला पाहिजे होतं, पण त्यांनी असं म्हटलं नाही.

सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, सीमा प्रश्नातला जो मुद्दा होता तो एकमतानं करायचा होता. त्यात पहिल्यांदा काही गावांचा उल्लेख प्रस्तावात करायला लावला आणि संपूर्ण ८६५ गावं यामध्ये सामिल करण्याचा ठराव केला. सुप्रीम कोर्टात हे प्रकरणात आहे त्यामुळं आम्ही हरीश साळवेंना वकील म्हणून देण्यास सांगितलं. ते सरकारनं मान्य केलं. त्याचबरोबर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही चहापानावर बहिष्कार टाकताना एक पत्र दिलं होतं.

महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं की पावसाळी अधिवेशन मिळून पुरवणी मागण्या ७७ ते ७८ हजार कोटींपर्यंत पोहोचल्या आहेत. शेवटच्या पुरवणी मागण्यांमध्ये त्या १ लाख कोटींच्यापुढे जातील. मी अर्थमंत्री म्हणून काम केलंय त्यामुळं सांगू इच्छितो की, यामुळं आर्थिक शिस्त बिघडेल. केंद्रानं दिलेल्या मर्यादा पाळून आर्थिक शिस्त सांभाळायची असते. केंद्रानं एक दंडक घालून दिलेला असतो पण तो देखील सरकार पाळणार नाही हे आत्ता स्पष्टपणे सांगता येणार नाही.

हे ही वाचा:

Mumbai Police शहरात रात्रभर ‘ऑपरेशन ऑल आऊट’, मुंबई पोलिस अँक्शन मोडवर

Eknath Shinde अधिवेशनाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांनी हादरवाला, पहा टीकेचे धनी कोण कोण बनले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version